शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित

By admin | Published: October 18, 2015 11:04 PM

जत तालुक्यात खरीप वाया : चाऱ्याचा प्रश्न तात्पुरता मिटणार; पेरणी अंतिम टप्प्यात

गजानन पाटील-- संख--गेल्या आठवड्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे कायम दुष्काळी जत तालुक्यातील रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पावसाअभावी सलग तिसऱ्या वर्षी खरीप हंगाम वाया गेला होता; परंतु परतीच्या पावसाने सप्टेंबर महिन्यामध्ये समाधानकारक हजेरी लावली आहे. सध्या पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. काही भागाचा अपवाद वगळता पाऊस झाल्याने हंगाम पार पडण्याची शक्यता आहे. रानात खुरटे गवत आल्याने जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न तात्पुरता मिटला आहे. सर्वत्र पेरणी सुरू झाल्याने मजुरीच्या व बैलजोडीच्या दरात वाढ झाली आहे. यंदा मान्सून पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. जनावरांच्या चाऱ्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली होती. आॅगस्ट महिन्यामध्ये ५४ गावांत ४७ टॅँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात होता. अशावेळी सर्व मदार परतीच्या पावसावर अवलंबून होती.परतीच्या पावसाने सप्टेंबर महिन्यामध्ये हजेरी लावली. गेल्या आठवड्यामध्ये पाऊस समाधानकारक पडल्याने पेरणीला सुरुवात होऊन ६७ टक्के पेरणी झाली आहे. तालुक्याचे सरासरी पर्जन्यमान ४६३ मिलिमीटर असून, आजअखेर २२६.८९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सरासरी ४८ टक्के पाऊस झाला आहे. दमदार पाऊस न झाल्याने एकही तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला नाही.पावसाने विश्रांती घेतल्याने पेरणीची लगबग सुरू झाली आहे. रब्बी हंगाम हा तालुक्यातील शेतीचा मुख्य हंगाम आहे. या हंगामात ९४ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पिके घेतली जातात. त्यापैकी ७८ हजार ९०० हेक्टर इतक्या प्रचंड क्षेत्रात ज्वारीचे पीक घेतले जाते.त्याशिवाय करडई २ हजार हेक्टर, सूर्यफूल ३ हजार १०० हेक्टर, गहू २ हजार ३०० हेक्टर, हरभरा २ हजार हेक्टर, मका ३ हजार ४०० हेक्टर क्षेत्रात घेतला जातो. उर्वरित इतर गळीत धान्ये घेतली जातात. बाजारात ज्वारीचे मालदांडी (३५-१), स्वाती (एस ९ आर) बियाणे उपलब्ध आहे. याशिवाय संकरित ज्वारीचे, सी-सी एच ८ आर, ही घरगुती बियाणे पेरली जातात. मक्याचे पारस, विजय, महाबीज, गंगा, कावेरी, मायको तसेच सूर्यफुलाचे महिको, विजय, महाधन, गंगा, कावेरी वाणांची बियाणे उपलब्ध आहेत.पेरणी सर्वत्र सुरू झाल्याने जत बाजारपेठेत, तहसील कार्यालय, गावात स्टॅन्डवर नेहमीसारखी गर्दी दिसून येत नाही. सर्वत्र कामाची धांदल सुरू झाल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. बियाणे, खताचे दर गेल्यावर्षीपेक्षा १० टक्क्याने वाढले आहेत. आगाप पेरणी झालेल्या ठिकाणी अनुकूल हवामान, पाऊस यामुळे उगवण चांगली झाली आहे.पाऊस दमदार झाला नसल्याने जमिनीखालील पाण्याच्या पातळीत वाढ झालेली नाही. अजूनही उमराणी, डफळापूर, अमृतवाडी, सिंदूर, उटगी, बिळूर, हळ्ळी, सुसलाद, बेवनूर, जाडरबोबलाद, सोन्याळ, माणिकनाळ, येळवी, अंतराळ, बसरगी, निगडी खुर्द, गोंधळेवाडी, सोनलगी, मोरबगी, अंकलगी, बालगाव, लकडेवाडी या २४ गावांत ३१ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.पावसाने दिलासा : बैलजोडीचा भाव वाढला दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील बैलजोड्यांची संख्या कमी झाली आहे. पेरणी सर्वत्र सुरू झाल्याने बैलजोड्यांना मागणी वाढली आहे. ट्रॅक्टरपेक्षा बैलजोड्यांद्वारे पेरणी केल्यास पिकांची उगवण चांगली होते, असे शेतकऱ्यांचे मत आहे. पेरणीसाठी बैलजोडीचा दर १७०० ते २ हजार रुपये इतका आहे. १ दिवसासाठी पुरुषास २०० रुपये, तर स्त्री मजुरासाठी १५० रुपये मजुरी आहे.