शहरं
Join us  
Trending Stories
1
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
2
'शरद पवार दैवत'ने अजित पवारांचं वाढवलं टेन्शन, सुप्रीम कोर्टात पोहोचलं प्रकरण
3
तिरुपती बालाजी मंदिर लाडू वादावर असदुद्दीन ओवेसी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
5
तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात मोठी कारवाई! टीटीडीकडून 'या' डेअरीच्या विरोधात तक्रार दाखल
6
सत्ता आल्यावर कसा निवडला जाणार मविआचा मुख्यमंत्री? पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितला फॉर्म्युला 
7
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
8
Video - "मी ऑनलाइन गेममध्ये १५ लाख गमावले, मला ५००-५०० रुपयांची मदत करा"
9
Swiggyचा आयपीओ येण्यापूर्वी राहुल द्रविड पासून करन जोहर पर्यंत दिग्गजांच्या उड्या, पाहा डिटेल्स
10
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
11
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
12
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
13
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
14
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
15
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
16
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
17
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
18
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
19
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
20
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं

‘किसान ॲप’चे वरातीमागून घोडे; वादळ येऊन गेल्यानंतर अलर्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 4:30 AM

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शेतकऱ्यांना हवामानाची माहिती देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विकसित केलेले ‘किसान ॲप’ म्हणजे असून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शेतकऱ्यांना हवामानाची माहिती देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विकसित केलेले ‘किसान ॲप’ म्हणजे असून अडचण आणि नसून खोळंबा अशी स्थिती आहे. खुद्द कृषी विभागासह अनेक शेतकऱ्यांच्या वापरातही ते नाही. हवामान अंदाजासाठी शेतकरी विद्यापीठाची माहिती केंद्रे तसेच टाटा व रिलायन्ससारख्या काही संस्थांच्या ॲपवर अवलंबून आहेत.

प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा आणि वादळ, वाऱ्यामुळे संभाव्य नुकसान टळावे, या हेतूने विविध ॲप विकसित करण्यात आली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ‘किसान ॲप’ होय. जिल्ह्यात अत्यंत मोजकेच शेतकरी त्याचा वापर करतात. पण हे ॲप म्हणजे ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशी अवस्था आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, या ॲपवरुन वेळेत संदेश मिळत नाहीत. गेल्या पंधरवड्यात तौक्ते वादळाचे संदेश वादळ येऊन गेल्यावर आले. अनेकदा वादळ, पाऊस येऊन गेल्यावर संदेश येतात. वादळी पाऊस येणार असल्याने वैरण, धान्य, जनावरे संरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना मिळतात, पण तोपर्यंत वादळ येऊन गेलेले असते. त्याने जीवित व वित्तहानी केलेली असते. या ॲपचा फायदा होत नसल्याने अनेक शेतकरी ते डिलीट करत आहेत.

चौकट

किसान ॲपवरुन ही माहिती मिळते

१. किसान ॲपवरुन हवामान, वादळ, अवकाळी पाऊस, पीक पेरणी, विजांचा कडकडाट, आदी माहिती मिळते.

२. प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेसह पीककर्ज, पीकविम्याच्या अनुषंगाने माहिती मिळते.

३. शेतीविषयक शासनाच्या योजना, अनुदाने, अर्ज करण्याची प्रक्रिया यांचीही माहिती मिळते.

४. जनावरांच्या आजाराच्या साथी, पिकांची मशागत, काढणी, पिकांवर पडणारे रोग व त्यावर औषध योजना यांचीही माहिती दिली जाते.

चौकट

माहिती वेळेत मिळाली तरच ॲपचा फायदा

- किसान ॲपवरुन शेतीविषयक माहिती व सूचना वेळेत मिळाल्या तरच फायदा होतो.

- वादळी पाऊस, विजांचा कडकडाट यांची माहिती किमान काही तास अगोदर मिळाली तरच धान्यसाठे, जनावरांचे संरक्षण करता येते.

- पिकांवरील कीड, जनावरांचे आजार आदींची माहिती योग्यवेळी मिळाली तर औषध योजना करता येते, पिकांचा बचाव करणे शक्य होते.

कोट

किसान ॲप हे स्वतंत्र ॲप आम्ही वापरत नाही. कृषी विभागाने काही स्वतंत्र ॲप उपलब्ध करुन दिली आहेत, त्यावरुन वेळेत मेसेज येतात. काही शेतकरी किसान ॲप वापरत होते, पण त्यावरुन सूचना योग्यवेळी मिळायच्या नाहीत. वादळ, पाऊस येऊन गेल्यावर मेसेज यायचे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हे ॲप डिलीट केले आहे. सध्या कृषी विभागाच्या संदेशांचा फायदा होतो.

- सुभाष पाटील, शेतकरी, वाळवा.

गेल्या पंधरवड्यात जोरदार अवकाळी पावसाचे इशारे मिळाले, पण तोपर्यंत पाऊस सुरु झालेला होता. किसान ॲपऐवजी आम्ही अन्य खासगी कंपन्यांच्या मेसेजचा वापर करतो, त्यांच्याकडून काही तास अगोदर किंवा आदल्या दिवशी पूर्वकल्पना मिळते.

- अनिल खैरावे, शेतकरी, कवठेमहांकाळ

सुरुवातीला काही दिवस ॲपचा वापर केला, पण अनुभव चांगला नव्हता. शिवाय फक्त ॲपवर विसंबून शेती करता येत नाही. सध्या दोन ते तीन ॲपवरुन अंदाज घेत राहतो, त्यामुळे नुकसान टळते. शासनाने शेतकऱ्यांसाठी हमखास भरवशाची माहिती देणारे संकेतस्थळ विकसित करायला हवे.

- अर्जुन शिंगाडे, शेतकरी, लक्ष्मीवाडी

विद्यापीठाचे ॲप भरवशाचे

जिल्ह्यात स्वतंत्र किसान ॲप फारसे वापरात नाही. काही खासगी कंपन्या, विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे यांच्याकडून वेळेत माहिती मिळते. ती अचूकदेखील असते. जिल्ह्यातील अडीच लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे मोबाईल क्रमांक आम्ही शासनाला कळवले होते, त्यावरही नियमित संदेश येतात, त्यांचा शेतकऱ्यांना फायदाही होतो.

- सुरेश मगदूम, कृषी उपसंचालक, सांगली