शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

आयुक्तांकडून वृक्षारोपण कार्यक्रम हायजॅक

By admin | Published: July 01, 2016 11:48 PM

बालाजीनगरमध्ये मोहीम : महापालिका पदाधिकारी येण्यापूर्वी वृक्षारोपण आटोपले

सांगली : वन महोत्सवाच्या निमित्ताने महापालिकेच्यावतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम शुक्रवारी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी हायजॅक केला. पालिकेच्या कार्यक्रमाला महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती यांना निमंत्रण देण्यात आले. पण ते येण्यापूर्वीच वृक्षारोपण करून ‘प्रोटोकॉल’ला हरताळ फासला. पालिका प्रशासनाच्या या अतिउत्साही कारभाराबद्दल नगरसेवकांतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. वन महोत्सवानिमित्त महापालिकेच्यावतीने सांगलीतील बालाजीनगर व मिरजेतील मिरज ओढा येथे वृक्षारोपणाचा अधिकृत कार्यक्रम आयोजित केला होता. महापौर हारूण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, वृक्ष समितीच्या सदस्यांना शुक्रवारी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार असल्याचे निमंत्रण प्रशासनाने दिले होते. बालाजीनगर येथील कार्यक्रमाची जय्यत तयारीही प्रशासनाने केली होती. त्यासाठी खुद्द सभापती संतोष पाटील यांनी मोठे सहकार्य केले होते. त्यांच्या प्रभागातील एका कामावरील जेसीबी बालाजीनगर येथे पाठवून १६० खड्डे काढण्यात आले. पण शुक्रवारी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमावेळी वेगळाच अनुभव आला. आयुक्त खेबूडकर यांनी साडेनऊच्या सुमारास आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला. पण महापालिकेचा कार्यक्रम असल्याने प्रोटोकॉलनुसार पदाधिकारी उपस्थित आहेत की नाही, याचीही दखल आयुक्तांनी घेतली नाही. महापौर, उपमहापौरांना दहा वाजताचे निमंत्रण होते. तत्पूर्वीच वृक्षारोपण करण्यात आले. दहा वाजण्यापूर्वी स्थायी समिती सभापती संतोष पाटील कार्यक्रमस्थळी आले. त्यानंतर अगदी पाच मिनिटात उपमहापौर विजय घाडगेही तिथे पोहोचले. पण तत्पूर्वीच दहा ते पंधरा रोपे लावली गेली होती. या प्रकाराने पदाधिकारी अचंबित झाले. किमान प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तांनी तरी प्रोटोकॉल पाळण्याची गरज होती. पण त्यांनी हरताळ फासल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी) सांगली : वन महोत्सवाच्या निमित्ताने महापालिकेच्यावतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रम शुक्रवारी आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी हायजॅक केला. पालिकेच्या कार्यक्रमाला महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती यांना निमंत्रण देण्यात आले. पण ते येण्यापूर्वीच वृक्षारोपण करून ‘प्रोटोकॉल’ला हरताळ फासला. पालिका प्रशासनाच्या या अतिउत्साही कारभाराबद्दल नगरसेवकांतून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. वन महोत्सवानिमित्त महापालिकेच्यावतीने सांगलीतील बालाजीनगर व मिरजेतील मिरज ओढा येथे वृक्षारोपणाचा अधिकृत कार्यक्रम आयोजित केला होता. महापौर हारूण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, स्थायी समिती सभापती संतोष पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक, वृक्ष समितीच्या सदस्यांना शुक्रवारी सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम होणार असल्याचे निमंत्रण प्रशासनाने दिले होते. बालाजीनगर येथील कार्यक्रमाची जय्यत तयारीही प्रशासनाने केली होती. त्यासाठी खुद्द सभापती संतोष पाटील यांनी मोठे सहकार्य केले होते. त्यांच्या प्रभागातील एका कामावरील जेसीबी बालाजीनगर येथे पाठवून १६० खड्डे काढण्यात आले. पण शुक्रवारी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमावेळी वेगळाच अनुभव आला. आयुक्त खेबूडकर यांनी साडेनऊच्या सुमारास आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला. पण महापालिकेचा कार्यक्रम असल्याने प्रोटोकॉलनुसार पदाधिकारी उपस्थित आहेत की नाही, याचीही दखल आयुक्तांनी घेतली नाही. महापौर, उपमहापौरांना दहा वाजताचे निमंत्रण होते. तत्पूर्वीच वृक्षारोपण करण्यात आले. दहा वाजण्यापूर्वी स्थायी समिती सभापती संतोष पाटील कार्यक्रमस्थळी आले. त्यानंतर अगदी पाच मिनिटात उपमहापौर विजय घाडगेही तिथे पोहोचले. पण तत्पूर्वीच दहा ते पंधरा रोपे लावली गेली होती. या प्रकाराने पदाधिकारी अचंबित झाले. किमान प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तांनी तरी प्रोटोकॉल पाळण्याची गरज होती. पण त्यांनी हरताळ फासल्याची चर्चा आहे. (प्रतिनिधी) नगरसेवकांत नाराजीमहापालिकेचा कार्यक्रम महापौर, उपमहापौर यांच्या उपस्थितीत झाला पाहिजे. आमदार, खासदारापेक्षाही महापौरांचा मान मोठा असतो. पण खुद्द आयुक्तांनीच त्याला हरताळ फासल्याने नगरसेवकांत नाराजी पसरली आहे. उपमहापौर विजय घाडगे हे तर वृक्ष समितीचे सदस्यही आहेत. पण तेही कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापूर्वीच वृक्षारोपण झाले होते. यासंदर्भात आयुक्त खेबूडकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा दूरध्वनी बंद होता.