सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. शहरासह ग्रामीण भागातही उपाययोजना करण्यात येत आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी रुग्णालये तत्काळ आरक्षित करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
श्वास मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कडेपूर, श्री सेवा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल व आय.सी.यू. सेंटर आटपाडी, सुश्रुषा हॉस्पिटल, इस्लामपूर,
ओमश्री हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, विटा, आष्टा क्रिटीकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आष्टा, श्री हॉस्पिटल विटा, लाईफकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, कैलास सेंटर विटा रोड, तासगाव, कवठे महांकाळ, कोविड हेल्थ सेंटर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, कवठे महांकाळ, जत कोविड सेंटर, शासकीय निवासी शाळा जत ही कोविड रुग्णांवरील उपचारासाठी आरक्षित करण्यात आली आहेत.
आरक्षित करण्यात आलेल्या ठिकाणी कोविड उपचारासाठी आयसीयू व आयसोलेशन वार्ड त्वरित कार्यान्वित करण्यात येणार आहेत.
प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. आरक्षित रुग्णालयात कार्यरत कर्मचाऱ्यांनी कामात कसुर केल्यास त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.