रेठरे धरण (ता. जत) गावात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १९५ पर्यंत गेली आहे. गावातील सहा व बाहेरकामास असणारे दोन, तसेच येथील संसर्गातून बाहेरगावचे तीन असे एकूण ११ रुग्ण कोरोनाला बळी पडले आहेत.
रेठरे धरण येथे एकूण रुग्ण १९५ झाले, तर ११४ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या होम आयसोलेशनमध्ये ६० रुग्ण व रुग्णालयात ५ रुग्ण उपचार घेत आहेत. रेठरे धरण ग्रामपंचायत, जिल्हा परिषद आरोग्य केंद्र व सरकारी रुग्णालयाच्यावतीने कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
रेठरे धरण येथे गेले महिनाभरात रुग्ण वाढल्याने चिंता व्यक्त केली जात होती. आपत्ती व्यवस्थापन समिती, सर्व लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, इस्लामपूर पोलीस अधिकारी व कर्मचारी गर्दी कमी करण्यासाठी कारवाई करत लक्ष ठेवून आहेत.