शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
2
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
3
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
4
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
8
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
9
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
10
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
11
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
12
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
13
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
14
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
15
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
16
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
17
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
18
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
19
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
20
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले

खासदारांकडून तासगावातील अवैध धंदेवाल्यांचा ठेका

By admin | Published: July 21, 2016 11:39 PM

महादेव पाटील : उद्यानाच्या जागेत माजी नगरसेवकाचे कार्यालय

तासगाव : तासगाव शहरातील सांगली नाका येथे वाचनालयाची इमारत आहे. या इमारतीला लागून असलेल्या उद्यानाच्या जागेवर माजी नगरसेवक मोहन कांबळे यांच्या मुलाने संपर्क कार्यालय थाटले आहे. ते बेकायदेशीर असतानादेखील खासदारांनी त्याचे उद्घाटन केले आहे. शहरातील अवैध धंदे असलेल्या गावगुंडांची पाठराखण करण्याचा ठेकाच खासदार संजयकाका पाटील यांनी घेतला असल्याची टीका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव पाटील यांनी पत्रकार बैठकीत केली. बेकायदेशीर खोके हटविले नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी पाटील यांनी दिला.सांगली नाका येथे काही दिवसांपूर्वी मंडळाच्या जागेवर काही नगरसेवकांनी बेकायदेशीररित्या अतिक्रमण केलेल्या इमारतीचे खासदार संजयकाका पाटील यांनी उद्घाटन केले होते. त्याबाबत शहरातील नागरिकांकडून टीकाही झाली होती. त्यानंतर पुन्हा अशाच पध्दतीने बेकायदेशीर कामांना पाठबळ देण्याचा सपाटा खासदारांकडून सुरू आहे. वाचनालयालगत उद्यानासाठीची जागा आहे. या जागेत खासदार समर्थक माजी नगरसेवक मोहन कांबळे यांच्या मुलाने खोके थाटले आहे. या खोक्याचे उद्घाटनही खासदारांनी केले होते. या खोक्यामधून अनेक बेकायदेशीर उद्योग सुरू असतात. शहरातील अशा अनेक दोन नंबर धंद्यांची पार्श्वभूमी असणाऱ्यांना खासदारांकडून पाठबळ मिळत आहे. प्रशासनावर दबाव आणून अशाप्रकारचे उद्योग होत असल्याचा आरोपही यावेळी महादेव पाटील यांनी केला. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी रवींद्र साळुंखे आणि महेश पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)मुख्याधिकाऱ्यांना निवेदन बेकायदेशीर खोक्याबाबत मुख्याधिकारी अभिजित वायकोस यांना निवेदन दिले आहे. चार दिवसांत हा बेकायदेशीर गाळा काढण्यात आला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महादेव पाटील यांनी यावेळी दिला. तसेच नागरिकांच्या मदतीने बेकायदेशीर अतिक्रमणे काढण्यासाठी स्वत: पुढाकार घेण्याचा इशाराही यावेळी पाटील यांनी दिला.