ठळक मुद्देपुतळा न बसवल्यास पालिका पेटवून देण्याचा इशाराराष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बघ्याची भूमिकाखुर्च्या फेकून देत काचा फोडल्या
सांगली : तासगावात वारंवार मागणी करूनही शिवरायांचा पुतळा बसवला जात नाही, नगरपालिका पुतळ्याबाबत राजकारण करत आहे, असा आरोप करीत तासगावात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष विजय सावंत यांच्या दालनाची तोडफोड केली. खुर्च्या फेकून देत काचा फोडल्या.यावेळी 30 जुलैपर्यंत पुतळा न बसवल्यास पालिका पेटवून देण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिला होता. नगराध्यक्षांचे दालन फोडत असताना भाजप नगरसेवकांनी नगराध्यक्षांना एकट्याला सोडून पळ काढला, तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बघ्याची भूमिका घेतली.दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून शिवसैनिक या आंदोलनाबाबत पोलिसांना निवेदन देण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पोलिसांनी निवेदन स्वीकारले नाही.