भडकंबे (ता. वाळवा) येथे झीरो बजेट नर्सरीचे प्रशिक्षण शेतकऱ्यांना देण्यात आले. यावेळी पंकज बामणे, सुनील पाटील, रोहित पाटील, शरद कुलकर्णी आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांना झीरो बजेट सुपरकेन नर्सरीचे प्रशिक्षण देण्यात आले. भडकंबे येथे ‘ग्रामीण कृषी जागरुकता अभियान आणि औद्योगिक कार्यानुभव’ अभियानांतर्गत नुकतेच प्रशिक्षण दिले.
कृषी शाखेचे विद्यार्थी पंकज बामणे व सहकाऱ्यांनी घरच्या घरी स्वस्तात रोपवाटिकेच्या टिप्स दिल्या. रोपवाटिका आणि आधुनिक शेतीची माहिती दिली. रोपवाटिका तयार करताना प्रक्रियायुक्त बियाणे निवडल्यास दर्जेदार रोपे मिळत असल्याचे सांगितले. औषध योजना, बियाणे प्रक्रिया, बुरशीनाशकांचा वापक, गादीवाफे बनविणे, बियाणांची टोकणी, पाचट व मल्चिंग पेपरचा वापर आदीची माहिती दिली.
यावेळी सुनील पाटील, रोहित पाटील, शरद कुलकर्णी, सुयश कुलकर्णी, सूरज स्वामी, कृष्णात पाटील, शुभम पाटील, युवराज पाटील, संकेत डोंबाळे आदी शेतकरी उपस्थित होते.
तळसंदे येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. शेलार, प्रा. तेजस्विनी कडेगावकर, प्रा. सूरज घोलप, प्रा. आशुतोष पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.