शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

मुंबईतील राजभवनाचे हाऊसकिपिंग सांगलीतील मेघना कोरे यांच्याकडे; सांगलीकरांचा बहुमान; प्रतिष्ठेची, अभिमानाची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 1:23 AM

त्यातून आत्मविश्वास दुणावल्याने थेट राजभवनाचीच जबाबदारी आव्हान म्हणून स्वीकारली आहे. महाराष्ट्राच्या संविधानिक प्रमुखांचे निवासस्थान असणाऱ्या राजभवनाची वास्तू सौंदर्याचा अद्वितीय नमुना आहे. मलबार हिलवर पन्नास एकरांत पसरलेल्या राजभवनाचे व्यवस्थापन ही अभिमानाची आणि तितकीच जबाबदारीचीही कामगिरी आहे.

ठळक मुद्दे. दुर्मीळ वृक्ष, फुलझाडे, लॉन यांची विशेष काळजी घ्यावी लागते.

संतोष भिसे ।सांगली : अवघ्या महाराष्ट्राच्या प्रशासनाचा अवाढव्य डोलारा सांभाळणाऱ्या मुंबईतील राजभवनाचे व्यवस्थापन करण्याची प्रतिष्ठेची जबाबदारी सांगलीतील महिलेकडे आली आहे. प्रतिथयश उद्योजिका मेघना कोरे नव्या वर्षात राजभवनाचे ‘हाऊसकिपिंग’ करणार आहेत. सांगलीकरांसाठी ही अभिमानाची आणि बहुमानाची कामगिरी ठरली आहे.या कामासाठी राज्यातून सहा आस्थापनांनी तयारी दर्शविली होती. त्यातून मेघना कोरे यांच्या सूर्या सेन्ट्रल ट्रिटमेन्ट फॅसिलिटी फर्मने बाजी मारली. त्यांचा एमआरके ग्रुप पश्चिम महाराष्ट्रात विविध व्यावसायिक क्षेत्रात अग्रेसर आहे. त्याअंतर्गत सूर्या फर्म काम करते. प्रामुख्याने सेवा क्षेत्रात अनेक वर्षांपासून तिची स्वतंत्र ओळख आहे. व्यवसायाच्या निमित्ताने जगभर फिरणाºया मेघना कोरे यांनी देशोदेशीच्या सेवाक्षेत्राचा जवळून अनुभव घेतला. त्यातून आत्मविश्वास दुणावल्याने थेट राजभवनाचीच जबाबदारी आव्हान म्हणून स्वीकारली आहे. महाराष्ट्राच्या संविधानिक प्रमुखांचे निवासस्थान असणाऱ्या राजभवनाची वास्तू सौंदर्याचा अद्वितीय नमुना आहे. मलबार हिलवर पन्नास एकरांत पसरलेल्या राजभवनाचे व्यवस्थापन ही अभिमानाची आणि तितकीच जबाबदारीचीही कामगिरी आहे. राज्याचे प्रमुख या नात्याने राज्यपालांना भेटण्यासाठी देशोदेशींचे राजदूत, लोकप्रतिनिधी, वरिष्ठ सनदी अधिकारी, तसेच उद्योजकांचा दररोज राबता असतो. त्यामुळे राजभवनाची अतिथ्यशीलता अत्यंत जबाबदारीचा भाग ठरते. समुद्राच्या खाºया वाºयामुळे राजभवनातील फ्रेंच बनावटीचे फर्निचर नियमितपणे स्वच्छ करावे लागते. त्यासाठी खास झिलाईगार ठेवावे लागतील. विस्तीर्ण उद्यान पाहण्याऱ्यांचे डोळे निववतात; मात्र त्याचे सौैंदर्य जपण्यासाठी, खुलविण्यासाठी लागणारे परिश्रमही तितकेच मोठे आहेत. उद्यान व्यवस्थापनाचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले माळी त्यासाठी उपलब्ध करावे लागतात. दुर्मीळ वृक्ष, फुलझाडे, लॉन यांची विशेष काळजी घ्यावी लागते.

राजभवनातील दरबार हॉल आणि दिवाणखाना हे सर्वांत महत्त्वाचे भाग आहेत. बहुतांशी राजकीय व प्रशासकीय घडामोडी, बैठका, महत्त्वाच्या भेटीगाठी व सल्लामसलती येथेच होतात. प्रसंगी सरकारचे, मंत्र्यांचे शपथविधीही येथेच होतात. त्यादृष्टीने त्यांचे महत्त्व खूपच मोठे आहे. त्यांचेही व्यवस्थापन केले जाणार आहे. राजभवनाची वास्तू हेरिटेज तथा ऐतिहासिक वारसा स्थळांमध्ये मोडते. त्यामुळे त्याची देखभाल अन्य सामान्य इमारतींसारखी करून चालत नाही. त्यासाठीचे विशेष कौशल्य असणारे कर्मचारी पुरवावे लागणार आहेत. ही सारी कामगिरी आता मेघना कोरे करणार आहेत.

  • स्वातंत्र्यानंतर प्रथमच आऊटसोर्सिंग

राजभवनाचे व्यवस्थापन स्वातंत्र्यकाळापासून शासकीय कर्मचारी करीत आहेत. आता प्रथमच त्याचे आऊटसोर्सिंग करण्यात आले आहे. संवेदनशील अणि महत्त्वाचे विभाग वगळता अन्य विभागांचे व्यवस्थापन आऊटसोर्सिंगचे कर्मचारी करतील. 

कर्तबगारी सिद्ध करून दाखवूराजभवनाचे व्यवस्थापन ही आमच्यासाठी प्रतिष्ठेची व आव्हानात्मक जबाबदारी आहे. महिला म्हणून स्वत:ची कर्तबगारी सिद्ध करून दाखविण्याची संधी, या दृष्टिकोनातून त्याकडे मी पाहते. माहेरच्या आरवाडे आणि सासरच्या कोरे कुटुंबियांनी दिलेला सामाजिक कामांचा वारसा व आत्मविश्वास याकामी उपयोगी पडणार आहे.- मेघना कोरे, सांगली.

टॅग्स :SangliसांगलीMumbaiमुंबई