शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
2
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
4
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
6
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
7
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
8
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
9
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
10
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
11
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
12
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
13
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
14
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
15
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
17
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
18
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
19
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
20
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया

ऐन सणासुदीत कांदा आणणार गृहिणींच्या डोळ्यात पाणी! । आवकेवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 11:27 PM

गेल्या आठवड्यापासून कांदा दरात चांगलीच वाढ होत आहे. ४५ रुपये किलोवर असलेला दर आता ६० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. येथील फळ मार्केटमध्ये कर्नाटकसह नाशिक भागातून कांद्याची आवक होते. या आठवड्यातील आवक लक्षात घेता, शुक्रवारी अवघी ८० टन आवक झाली होती, तर शनिवारी यात वाढ होत ४०० टन कांद्याची आवक झाली आहे.

ठळक मुद्दे बाजारात कांदा प्रतिकिलो ६० रुपयांवरकर्नाटकातून होणारी आवक घटल्याने दर भडकले

शरद जाधव ।सांगली : अवघ्या आठ दिवसांवर आलेला नवरात्रोत्सव, त्यानंतर लागलेले दिवाळीचे वेध अशा ऐन सणासुदीच्या धामधुमीत गृहिणींच्या स्वयंपाकघरातील महत्त्वाचा घटक असलेल्या कांदा दरात लक्षणीय वाढ होत आहे. घाऊक बाजारात होत असलेल्या आवकेवर झालेला परिणामस्वरूप सध्या कांद्याचा दर प्रतिकिलो ६० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. आवक वाढली तरच दर आवाक्यात येण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यापासून कांदा दरात चांगलीच वाढ होत आहे. ४५ रुपये किलोवर असलेला दर आता ६० रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. सध्या सणासुदीचे दिवस सुरू झाले असून, दसरा-दिवाळी या वर्षातील सर्वात मोठ्या सणांची तयारी हळूहळू घराघरात सुरू झाली आहे. सांगली परिसरात तर पुरामुळे अगोदरच जनजीवन विस्कळीत झाले असताना, दैनंदिन जीवनात आवश्यक असलेल्या कांदा, लसणाच्या दरात होत असलेली वाढ गृहिणींना चिंतेत टाकणारी आहे.

येथील फळ मार्केटमध्ये कर्नाटकसह नाशिक भागातून कांद्याची आवक होते. या आठवड्यातील आवक लक्षात घेता, शुक्रवारी अवघी ८० टन आवक झाली होती, तर शनिवारी यात वाढ होत ४०० टन कांद्याची आवक झाली आहे.सरासरी ४ हजार ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल दराने कांद्याची विक्री झाली. घाऊक बाजारातच कांद्याचे दर वाढल्याने स्वाभाविकपणे ग्राहकांना जादा दराने कांदे खरेदी करावे लागत आहेत. फळ मार्केटमध्ये होणाऱ्या सौद्यांमध्ये सरासरी साडेतीन हजार ते ५ हजार पोत्यांची आवक होत असते. मात्र, आवक नसल्याने दरातील वाढ कायम आहे.

कर्नाटकात कांदा उत्पादन होत असलेल्या काही भागात दुष्काळी परिस्थिती आहे तर काही भागात अतिवृष्टीने कांदा पीक वाया गेले आहे. त्याचा थेट परिणाम आवकेवर झाला आहे. कर्नाटकातून होत असलेली आवक जवळपास ७० टक्क्यांनी घटली आहे.दिवाळीपर्यंत दरवाढ कायम?एका सौद्याला ८० टन, तर एकदा ४०० टन अशी आवक कमी जास्त होत असल्याने त्याचा परिणाम कांदा दरावर होणार आहे. येत्या महिन्याभरात तरी दरातील वाढ कायम राहण्याची शक्यता व्यापारीवर्गाने व्यक्त केली आहे. तरीही आवक वाढल्यास सर्वसामान्यांच्या आवाक्यात दर येतील, असा आशावादही व्यक्त केला आहे. 

आवक कमी-जास्त होत असल्यानेच दर वाढत आहेत. सध्या ४० ते ४५ रुपयांपर्यंत घाऊक दर आहेत. आवक वाढली तरच कांदा दरात घट जाणवणार आहे.राजेश पोपटाणी, अध्यक्ष, कांदा-बटाटा व्यापारी असोसिएशन. 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डSangliसांगली