शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
2
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
3
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
4
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
5
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
6
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
7
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
8
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
9
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
10
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
11
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
12
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
13
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
14
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
15
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
16
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
17
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
18
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
19
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
20
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी

दोन-तीन महिन्यांत वर्षभराचा विकासनिधी कसा संपवणार?, जिल्हा परिषदेच्या आचारसंहितेची टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 12:52 PM

राज्यातील सत्तेचा लंबक सतत इकडून तिकडे फिरत राहिल्याचा प्रतिकूल परिणाम विकासकामांवर झाला

संतोष भिसेसांगली : संपत आलेले २०२२ हे वर्ष राजकीय गोंधळ आणि निवडणुकांच्या साठमारीतच गेले. राज्यातील सत्तेचा लंबक सतत इकडून तिकडे फिरत राहिल्याचा प्रतिकूल परिणाम विकासकामांवर झाला. सर्वसामान्यांची कामे तर थांबलीच, शिवाय आता प्रशासनाचीही कसोटी लागणार आहे. विकासकामांचा निधी १०० टक्के खर्च करण्यासाठी अवघा दोन-तीन महिन्यांचाच कालावधी शिल्लक राहणार आहे. वर्षभराचा निधी अवघ्या दोन-तीन महिन्यांतच संपवावा लागणार आहे. सध्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी २३ डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू आहे. त्यामुळे सुमारे १३८ कोटींची कामे थांबली आहेत. प्रशासन निवडणुकीतून रिकामे झाल्यावर नव्या वर्षात कामाला लागेल, तोपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागेल. त्याची आचारसंहिता लागली, तर पुन्हा ब्रेक लागणार आहे. राज्यात ठाकरे सरकार सत्तेत असेपर्यंत अनेक कामांचे प्रस्ताव मंजूर झाले होते. जून महिन्यात शिंदे सरकारने सर्व कामांना स्थगिती दिली. नंतर त्यातील काही कामे टप्प्याटप्प्याने पुन्हा मंजूर केली, पण ग्रामपंचायतीच्या आचारसंहितेमुळे काही कामे रखडली. 

जिल्ह्याची अनेक महत्वाची कामे नियोजन समितीमधून मार्गी लागतात. सरकार बदलाच्या प्रक्रियेदरम्यान ती खोळंबली होती. वार्षिक योजनेचे ३६४ कोटी रूपये, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाचे ८३ कोटी ८१ लाख रूपये, आदिवासी घटक कार्यक्रमाचे १ कोटी १ लाख रूपये अशी एकूण ४४८ कोटी ८२ लाखांची कामे मंजुरीच्या प्रक्रियेत होती. सप्टेंबरअखेर वार्षिक योजनेसाठी शासनाकडून १११ कोटी ४२ लाख रूपये प्राप्त झाले. यामधील ३७ कोटी २९ लाख रूपये खर्ची पडले. उर्वरीत निधीच्या वेळेत खर्चासाठी गतीने नियोजन करावे लागणार आहे. ४०४ कोटी ७९ लाख रूपये प्राप्त सन २०२१-२२ मध्ये जिल्हा वार्षिक योजनेसाठी ३२० कोटी, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी ८३ कोटी ८१ लाख रूपये व आदिवासी घटक कार्यक्रमासाठी ९८ लाख रूपये असे एकूण ४०४ कोटी ७९ लाख रूपये प्राप्त झाले होते. मार्च २०२२ अखेर ४०३ कोटी ६१ लाख रूपये  खर्च झाले. उर्वरीत कामे या वर्षात संपवायची आहेत.

निधीच नाही, त्यामुळे खर्चाचा प्रश्नच नाहीदरम्यान, शासनाकडून निधी पुरवठ्यात हात आखडता घेतला जात आहे. सध्या सुरु असलेल्या व प्रशासकीय, तांत्रिक मान्यतेच्या कामांनाच निधी मिळत आहे. नव्या कामांना निधीची टंचाई आहे. निधीच नाही, त्यामुळे मार्चअखेर संपविण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार नाही असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर..

  • नव्या कामांना वेळेत प्रशासकीय मंजुरी घेऊन ठेवावी लागेल
  • नियोजन समितीतील कामांना दोन वर्षांची मुदत असल्याने दिलासा
  • आमदार, खासदार निधीतील कामांवर निर्बंधांची शक्यता
  • मार्चअखेर प्रतिपुर्तीला मुदतवाढ घ्यावी लागेल
  • औषध खरेदी, स्मार्ट पीएचसी, मॉडेल स्कूल अशा कामांपुढे निधीचे संकट
  •  कृषी, सार्वजनिक बांधकाम आदी राज्य शासनाच्या विभागांपुढे संकट नाही
टॅग्स :SangliसांगलीCode of conductआचारसंहिता