शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

पदांसाठी लाचार कसे होता?

By admin | Published: March 16, 2016 8:28 AM

अण्णा डांगे : महादेव जानकरांच्या भूमिकेवर टीकास्त्र

सांगली : आयुष्यभर ज्यांना शिव्या घातल्या, त्यांच्याच पायाला पुन्हा लोणी लावण्याचे काम जिल्ह्यातील स्वाभिमानी म्हणवणारे नेते करीत आहेत. एखाद्या समाजाचे नेतृत्व करताना पदांसाठी हे लोक लाचार कसे होतात? अशा पदांना लाथ मारून स्वाभिमानाने राजकारण करता आले पाहिजे, अशी टीका माजी मंत्री व राष्ट्रवादी नेते अण्णा डांगे यांनी महादेव जानकर यांचे नाव न घेता केली. धनगर समाजाचे नेते महादेव जानकर यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांसोबत एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती. याच राजकारणाचा धागा पकडत डांगे म्हणाले की, महाराष्ट्रात हे कसले राजकारण सुरू आहे? मंत्रिपदासाठी केविलवाणी धडपड सुरू आहे. एका समाजाचे नेतृत्व करून मतांचे राजकारण करायचे चालू आहे. समाजासाठी अशा पदांना लाथ मारायला हवी. एकूणच महाराष्ट्रातील राजकारणात जे काही चालले आहे, ते अत्यंत चुकीचे आहे. दुष्काळाच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांचे निर्णय चुकीचेच असले, तरी विरोधकांचा अकांडतांडवही काही बरोबर नाही. कॉँग्रेसनेही त्यांच्या सत्ताकाळात त्याच गोष्टी केल्या. विद्यमान मुख्यमंत्र्यांवर टीका करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांच्या कारकीर्दीत असेच निर्णय घेतले होते. त्यामुळे दुष्काळावर राजकारण करण्यापेक्षा एकत्रित येऊन प्रश्न सोडविला पाहिजे. यापूर्वीही १९७२ च्या दुष्काळावेळी आम्ही आंदोलने केली होती. रस्त्यावर उतरून किंवा अन्य मार्गाने आंदोलने करताना सभागृहातील चर्चा होणे महत्त्वाचे असते. विधिमंडळातील चर्चा बंद करण्यापर्यंतचे राजकारण कोणाच्याही हिताचे नाही. त्यामुळे चर्चा होऊन निर्णय घेतले गेले पाहिजेत. मागील अधिवेशनात ज्याबद्दल सरकारने आश्वासने दिली होती, त्याची उत्तरे या अधिवेशनात त्यांना देणे भाग होते. मात्र चर्चाच बंद होत असतील, तर प्रश्न अणि उत्तरांचा संबंधच उरत नाही. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हाच अपेक्षा सोडल्याराष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतरच अपेक्षा सोडल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीत पक्षाने माझ्याकडे कोणतेही काम दिलेले नाही. पदाची किंवा अन्य कोणत्याही सन्मानाची अपेक्षाही आता सोडून दिलेली आहे. धनगर समाजाला आरक्षण मिळवून दिल्यास सर्व अपेक्षा पूर्ण झाल्याचे समाधान मिळेल, असे मत डांगे यांनी व्यक्त केले.