लोकमत न्यूज नेटवर्क
वाळवा : तालुक्यात बोरगाव व ताकारी येथे लोकमत व अशोकरावआण्णा सावकरदादा उद्योग समूह व ताकारी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रक्ताचं नातं’ या रक्तदान महायज्ञाला बुधवारी उदंड प्रतिसाद मिळाला. ‘लाेकमत’चे संस्थापक-संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
बोरगाव येथे शिबिराचे उद्घाटन तहसीलदार रवींद्र सबनीस, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, राज्य बॅकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक, जिल्हा उपरूग्णालयाचे अधिष्ठाता नरसिंह देशमुख, उपसरपंच शकील मुल्ला, युवा नेते धैर्यशील पाटील, कार्तिक पाटील, अभिजित पाटील यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी माणिकराव पाटील म्हणाले, ‘लोकमत’चा हा उपक्रम तरूण पिढीला प्रेरणा देणारा व सामाजिक बांधिलकी जपणारा आहे. असे उपक्रम राबवून ते यशस्वी करणे ही फार मोठी जबाबदारी ‘लोकमत’च्या माध्यमातून केली जात असल्याचा अभिमान वाटताे. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख म्हणाले, कोरोनाच्या महामारीत रूग्णांची गरज ओळखून ती गरज पूर्ण करण्याचे काम ‘लोकमत’ने हाती घतले. ही काैतुकास्पद बाब आहे. तहसीलदार रवींद्र सबनीस म्हणाले, रक्ताचा तुटवडा असताना जबाबदारी स्वीकारून समाजाला जागृत करून हा तुटवडा भरून काढण्याचे मोठे काम ‘लोकमत’ने केले आहे.
ताकारी येथील शिबिराचे उद्घाटन महानंदा दूध संघाचे माजी अध्यक्ष विनायकराव पाटील, सरपंच अर्जुन पाटील, उपसरपंच रवींद्र पाटील, ज्येष्ठ मार्गदर्शक सर्जेराव पवार, संतोष भांबुरे, सतीश पाटील, उत्तम चव्हाण, कुमार टोमके, जगन्नाथ पाटील, संभाजी पाटील यांच्या उपस्थितीत झाले.
यावेळी राजारामबापू कारखान्याचे संचालक कार्तिक पाटील, राजारामबापू सूत गिरणीचे संचालक उदयसिंह शिंदे, माजी उपसरपंच प्रमोद शिंदे, सूर्यकांत पाटील, जिल्हा तालीम संघाचे उपाध्यक्ष पै. विकास पाटील, ग्रामविकास अधिकारी बादशहा नदाफ, पोलीस पाटील पद्मा गिरीगोसावी, जुनेखेडचे सरपंच राहुल पाटील, संजय पाटील, उल्हास घाडगे, अरूण पाटील, मानसिंग पाटील, संभाजी पाटील, सदानंद शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते. धैर्यशील पाटील यांनी प्रास्तविक केले तर नितीन पाटील यांनी आभार मानले.
चौकट:
सामाजिक उपक्रमात ताकारीकर अग्रेसर
ताकारी गाव छोटे आहे पण बाजारपेठ मोठी आहे. नेहमीच या गावाने सामाजिक उपक्रमाला भरभरून मदत केली आहे. सामाजिक जाणिवेतून यापुढेही गावावर जी जबाबदारी टाकाल ती समाजासाठी पूर्ण करू, असा विश्वास सरपंच अर्जुन पाटील व्यक्त केला.