शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
4
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
5
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
6
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
7
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
8
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
9
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
10
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
11
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
12
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
13
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
14
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
16
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
17
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
18
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
19
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
20
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?

निराधार भावंडांना मिळतेय माणुसकीचे छत्र...- लिंगनूर येथील कहाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 11:22 PM

लिंगनूर : रामनगर (आरग, ता. मिरज) येथील मातृ-पितृ छत्र हरविलेल्या बहीण-भावंडांसाठी मायेचे आणि माणुसकीचे छत्र आता उभारले जाऊ लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलिंगनूर : रामनगर (आरग, ता. मिरज) येथील मातृ-पितृ छत्र हरविलेल्या बहीण-भावंडांसाठी मायेचे आणि माणुसकीचे छत्र आता उभारले जाऊ लागले आहे. या भावंडांच्या व्यथेची कथा आणि शाळेतील मुलांच्या मदतीची अनोखी घटना ‘लोकमत’ने मांडल्यानंतर आता समाजातील अन्य सामाजिक संस्था व व्यक्तींनीही मदतीचा हात पुढे केला आहे.

रामनगर (आरग) येथील सूरज चंद्रकांत नाईक व पूजा नाईक या निराधार भावंडांसाठी आता मदतीचा ओघ सुरू झाला आहे. निराधार मुलांसाठी काम करणाºया बीड व शिरगुप्पी येथील संस्थेने त्यांची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली आहे. तसेच मिरज पंचायत समिती सभापती जनाबाई पाटील, आरग येथील सामाजिक कार्यकर्ते सागर वडगावे, आरग ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव खटावे यांनी या मुलांना व त्यांच्या घरास भेट देऊन पाहणी केली आहे. त्यांच्या परिस्थितीचा आढावा घेऊन आमदार सुरेश खाडे यांनी देखील या भावंडांना आर्थिक मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.

लिंगनूरपासून पाच कि.मी. अंतरावर असलेल्या रामनगर येथील खोराडी वस्तीवरील सूरज चंद्रकांत नाईक याचे आई, वडील मूळचे मिरज येथील वीटभट्टी परिसरात राहायला होते. प्रथम त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याची आई मोलमजुरी करून दोन मुलांचा सांभाळ करीत होती. कालांतराने सूरजच्या आईला आजार जडला. त्यामुळे ती मावशीकडे रामनगर येथील खोराडी वस्तीवर राहायला आली. पण आजार वाढतच गेल्याने व पैशाअभावी वेळेत उपचार न झाल्याने ती मृत झाली. त्यावेळी सूरज तिसरीत शिकत होता, तर त्याची मतिमंद व अपंग बहीण घरीच होती.

आईच्या मृत्यूनंतर या दोन भावंडांचा सांभाळ आईची मावशी करत होती. पण मावशीला देखील कर्करोगाने गाठले आणि नियतीने चार वर्षांनंतर या भावंडांचे उरलेसुरले छत्रही हिरावून नेले. तिच्या मृत्यूवेळी अंत्यसंस्कारासाठी लागणाºया खर्चासाठी नातेवाईकांनी पाठ फिरवली. त्यावेळी लिंगनूरमधील काही नागरिकांनी तिच्या अंत्यविधीसाठी आर्थिक मदत केली. अशारितीने अपंग बहिणीसह सर्व जबाबदारी कोवळ्या लहान सूरजवर येऊन पडली.

बहीण (१५ वर्षे) अपंग व मतिमंद असल्याने, जेवण तयार करून तिला घास भरवणे, अंघोळ घालणे या सर्व सेवा सूरजलाच कराव्या लागत आहेत. दरम्यान, या जीवनाच्या लढाईत त्यांचे शिक्षण बंद झाले होते. मात्र सेवाआश्रम विद्यालय, लिंगनूरमधील शिक्षकांनी परत वयानुसार त्यांना शाळेत घेऊन, शैक्षणिक मदत देऊन शिक्षण प्रवाहात आणले. शाळेतील एस. एस. नलवडे, जी. आर. मगदूम, व्ही. एम. मगदूम व इतर शिक्षकांनी मदत करून पुन्हा त्यांचे शिक्षण सुरु केले. आजपर्यंत या भावंडांना त्यांच्या आजारपणात त्यांच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी वर्गणी काढून औषधोपचारासाठी आर्थिक मदत केली आहे. ही भावंडे सध्या रामनगर येथील एका झोपडीत जगण्याचा संघर्ष करीत आहेत. 

सूरज व बहीण पूजा हे झोपडीत दोघेच राहत असल्याने, त्यांना शासकीय मदत देऊन त्यांची राहण्याची व इतर सोय करण्यात येणार असून, सामाजिक संस्थांनीही या दोघा भावंडांचा सांभाळ करण्याची तयारी दर्शवली आहे.- सौ. जनाबाई पाटील, सभापती, मिरज पंचायत समिती