शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंमुळे अदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
3
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा', 'जिलेबी सेलिब्रेशन' अन् महायुतीच्या नेतेमंडळींचा तुफान जल्लोष
5
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
8
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
9
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
10
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
12
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
13
Dindoshi Assembly Election: संजय निरुपम पराभूत; निकराच्या लढतीत सुनील प्रभू विजयी
14
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
15
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
17
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
19
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
20
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

Sangli: पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पतीची आत्महत्या, पत्नीसह भोंदू महाराजावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 6:01 PM

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथे घराच्या पंख्यास गळफास घेऊन सतीश रवींद्र चव्हाण (वय ३०, रा. विद्यानगर, कवठेमहांकाळ) या तरुणाने आत्महत्या ...

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ येथे घराच्या पंख्यास गळफास घेऊन सतीश रवींद्र चव्हाण (वय ३०, रा. विद्यानगर, कवठेमहांकाळ) या तरुणाने आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नी व भोंदू महाराज या दोघांवर गुन्हा दाखल केला. पत्नी शीतल सतीश चव्हाण (रा.विद्यानगर, कवठेमहांकाळ), तर भोंदू महाराज दिनेश माने (रा.पंढरपूर, जि.सोलापूर) असे या दोन संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत राजेंद्र रवींद्र चव्हाण (रा.चिंचवड, पुणे,मूळ गाव बेनापूर, ता.खानापूर) यांनी फिर्याद दाखल केली असून, कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल केला आहे.याबाबत माहिती अशी की मंगळवारी दि १८ रोजी १०.३० वाजण्याच्या सुमारास सतीश चव्हाण याने राहते घरी पंख्यास गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ही आत्महत्या नसून सतीश यांची पत्नी शीतल हिची वरचेवर दातखिळी बसत असल्याने शीतलच्या माहेरचे लोक तिला उपचारासाठी भोंदू बाबामहाराज दिनेश माने यांच्याकडे पंढरपूर येथे घेऊन गेले होते. तेव्हापासून त्यांची एकमेकांची ओळख होऊन पुढे त्यांचे प्रेमसंबंध चालू झाले. त्यांना याबाबत समज देऊनही प्रेमसंबंध बंद करण्याबाबत सतीश यांनी दोघांनाही सांगितले होते. तरीही त्यांनी ऐकले नाही, त्यानंतर शीतल हिने पती सतीश यास घर नावावर करून दे असा तगादा लावत होती. तसेच दिनेश माने व शीतल यांच्या अनैतिक संबंधाला कंटाळून सतीश यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे मयत सतीश चव्हाण यांचा भाऊ राजेंद्र चव्हाण यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या दोघांवर कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, भोंदू महाराज दिनेश माने हा फरार झाला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक जोतिराम पाटील करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस