जालिंदर शिंदे ल्ल घाटनांद्रेकवठेमहांकाळ तालुक्यातील राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या कुची जिल्हा परिषद गटासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, हा गट सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव झाला असल्याने इच्छुक नेत्यांनी सौभाग्यवतीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. या गटात येणारे आगळगाव व कोकळे हे पंचायत समिती गण खुले असल्याने येथे खरी चुरस पाहावयास मिळणार आहे.पूर्वीचा आगळगाव जिल्हा परिषद गट बदलून नव्याने कुची जिल्हा परिषद गट निर्माण केला असून, या गटात नव्याने कुुची, शेळकेवाडी, थबडेवाडी या तीन गावांचा समावेश झाला आहे. या मतदारसंघावर आर. आर. पाटील व विजयराव सगरे समर्थक राष्ट्रवादीचे प्राबल्य असले तरी, गेल्या चार, साडेचार वर्षांत बरेच पाणी पुलाखालून गेले. आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर या गटातील अनेक आघाडीचे कार्यकर्ते खासदार संजयकाका पाटील यांचे नेतृत्व मानून भाजपमय झाले. खासदार पाटील यांनीही विविध विकास कामांच्या माध्यमातून भाजपची ताकद वाढवली. माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचीही या जिल्हा परिषद गटात भक्कम कार्यकर्त्यांची फौज असून, त्यामुळे येथील निवडणूक चांगलीच चुरशीची होणार आहे.दरम्यान, राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती दत्ताजीराव पाटील, विद्यमान बांधकाम सभापती प्रा. भाऊसाहेब पाटील यांनी आपल्या पत्नीसाठी उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, कॉँग्रेसकडून अलकूड (एस) च्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुुवर्णा आनंदराव चौगुले यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. भाजपकडून नुकतेच भाजपवासी झालेले आगळगाव सोसायटीचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील यांच्या पत्नी सुदर्शना पाटील, कुचीच्या एम. के. पाटील (सर) यांच्या पत्नी सुनंदा पाटील यांच्या नावांची जोरदार चर्चा असून, शिवसेनेकडून विभागप्र्रमुख संतोष भोसले (आगळगाव) यांच्या पत्नी सीमा भोसले यांच्या नावाची चर्चा आहे, तर वेळप्रसंगी भाजपचे खा. संजयकाका पाटील यांचे निकटवर्ती दादासाहेब कोळेकर यांच्या पत्नीच्या नावाचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.आगळगाव पंचायत समिती गटासाठी राष्ट्रवादीकडून विद्यमान सदस्य व उपसभापती जगन्नाथ कोळेकर, ‘महांकाली’चे संचालक काशिलिंग कोळेकर, तर लंगरपेठमधून महेश पवार इच्छुक असून, भाजपकडून आगळगाव सोसायटीचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील, कुचीचे विद्यमान सरपंच लक्ष्मण पवार, आनंदराव पाटील, संतोष पाटील इच्छुक असून, घोरपडे गटाकडून कुचीचे शामजी पाटील इच्छुक आहेत. कॉँग्रेस पक्षाकडून आगळगावचे माजी उपसरपंच चंद्रकांत जाधव, सुखदेव पाटील यांच्या नावाची चर्चा सध्या आहे. कोकळे पंचायत समिती गणातून कोणाकोणाला पक्षीय उमेदवारी मिळणार याबाबत उत्सुकता लागली असून, भाजपतर्फे माजी उपसभापती दादासाहेब कोळेकर, राष्ट्रवादीकडून महांकाली कारखान्याचे उपाध्यक्ष दीपक ओलेकर, कॉँग्रेसकडून धनाजी पाटील (कोकळे), बळवंत यमगर (अलकूड एस), शिवसेनेकडून ढालेवाडीचे बी. टी. चव्हाण लढणार असल्याचे बोलले जाते. त्यातच जिल्हा परिषद थबडेवाडी, कुची, शेळकेवाडी ही तीन गावे नव्याने समावेश केल्याने नवीन समीकरणे बघायला मिळणार आहेत. आगामी निवडणूक भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी होणार हे निश्चित असले तरी, कॉँग्रेसची ताकदही नाकारून चालणार नाही. जर कवठेमहांकाळ नगरपंचायतीसारखा स्वाभिमानी आघाडीचा प्र्रयोग झाला, तर चुरस चांगलीच रंगणार हे मात्र निश्चित आहे. सध्या या मतदार संघात म्हैसाळ व टेंभू योजनेच्या उर्वरित कामाचा मुद्दाच जास्त गाजला जाणार आहे.
कुची गटात सौभाग्यवतीसाठी पतींची धावपळ
By admin | Published: January 29, 2017 11:10 PM