देवराष्ट्रे : सत्तेचा वापर आम्ही लोकांसाठी केला. मात्र सत्ताबदल झाल्यानंतर काही महिन्यातच सरकारने लोकांना मेटाकुटीला आणले. जिल्ह्यात एकाही सरकारी कार्यालयाला स्वत:ची इमारत नव्हती. मी पालकमंत्री असताना जागा ताब्यात घेण्याचा आदेश काढला आणि त्या जागेवर प्रशासकीय इमारत, न्यायालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाचे बांधकाम करण्यात येत आहे. मी ठरवले की, कोणाचे काहीही चालत नाही! सरकार कोणाचेही असले तरी माझा एक फोन गेला तरी कोणतेही काम थांबत नाही, असा विश्वास काँग्रेसचे माजी मंत्री आमदार पतंगराव कदम यांनी व्यक्त केला. देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे अभियंता लालासाहेब मोरे यांची सांगली सॅलरी अर्नर्स सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी डॉ. कदम बोलत होते. यावेळी सोनहिरा कारखान्याचे अध्यक्ष मोहनराव कदम, अधीक्षक अभियंता हणमंतराव गुणाले, कार्यकारी अभियंता तानाजी सूर्यवंशी, डी. जी. मुलाणी, माजी उपसभापती मोहनराव मोरे उपस्थित होते. कदम म्हणाले की, देवराष्ट्रे ही भूमी आधुनिक महाराष्ट्राची प्रेरणा आहे. यशवंतरावांच्या विचारांची महाराष्ट्राला गरज आहे. यावेळी बाबासाहेब श्ािंंदे, बाबासाहेब महिंद यांची भाषणे झाली. जे. के. महाडिक, उपसभापती विठ्ठल मुळीक, पी. एम. काळे, सतीश चव्हाण, शिरीष पाटील यांचाही सत्कार करण्यात आला. सुनील मोरे, आत्माराम ठोंबरे, संजय मोरे, प्रशांत मोरे, राजेंद्र शिंंदे, रामभाऊ होनमाने, किरण मोरे, रामदास जमदाडे, चंद्रकांत साळुंखे, भानुदास शिरतोडे, रामदास महिंद, आर. वाय. पाटील यांनीे संयोजन केले. आनंदराव मोरे यांनी स्वागत केले. (वार्ताहर)
मी ठरवले की, कोणाचे काहीही चालत नाही! : पतंगराव कदम
By admin | Published: July 09, 2015 11:40 PM