सांगली : शहरातील बडोदेकर मळा परिसरात जळण घेण्यासाठी गेलेल्या महिलेस जळणात जाळण्याची धमकी देत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी निर्मला शिवाजी सकटे (रा. शिंदे मळा, पंचशिलनगर, सांगली) यांनी संगीता महेश भोरे व एक अल्पवयीन (दोघेही रा. बडोदेकर मळा, सांगली) यांच्याविरोधात शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवार, दि. २१ सप्टेंबर रोजी सकाळी अकराच्यासुमारास फिर्यादी निर्मला या रस्त्याचे काम चालू असल्याने काटेरी झाडे पडली होती. ती झाडे जळणासाठी आणण्यासाठी तेथे गेल्या होत्या. यावेळी त्यांच्याच भाच्याची पत्नी व एका अल्पवयीनाने त्यांना जळण घेण्यास अटकाव केला. तुला जळणात घालून जाळीन म्हणत त्यांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार दोघांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.