फोटो ओळ : शिराळा येथे आढावा बैठकी पालकमंत्री जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, जितेंद्र डुडी, ओंकार देशमुख, गणेश शिंदे, डॉ.अनिल बागल आदी उपस्थित होते.
लोकमत न्युज नेटवर्क
शिराळा : शिराळा तालुक्यातील कोविडबाबत आदर्श काम आहे. हे पाहून शिराळा मतदारसंघात समावेश असणारी वाळवा तालुक्यातील ४८ गावे शिराळा तालुक्यास जोडाविशी वाटतात. म्हणजे या गावांना चांगली आरोग्य सुविधा मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री जयंत पाटील यांनी केले.
येथील तहसीलदार कार्यालयात आयोजित कोरोनाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, प्रांताधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी डॉ.अनिल बागल, विराज नाईक, साम्राटसिंह नाईक, नगराध्यक्षा सुनीता निकम यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री पाटील यांनी यावेळी तालुक्यामधील शासकीय रुग्णालयांतील सुविधांबाबत माहिती घेतली.
आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की, आम्ही या तालुक्यातील रुग्ण येथेच उपचार करून बरा करण्याचा प्रयत्न करीत आहे. उपजिल्हा रुग्णालयात आणखी २५ ऑक्सिजन बेड वाढवत आहे, असे सांगितले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लवार, ज्ञानदेव वाघ, विजयराव नलवडे, विश्वास कदम, अतुल केकरे, मुख्याधिकारी योगेश पाटील, डॉ.जे. के. मोमीन, डॉ.अनिरुद्ध काकडे, बाहुबली हुक्कीरे, एन.टी. सूर्यवंशी, डॉ.मनोज महिंद, डॉ.सलमा इनामदार, दीपक चिलवान आदी उपस्थित होते.
चौकट
तालुकानिहाय लसी द्या
सध्या ऑनलाइन नोंदणीवर कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू आहे. तालुक्यात ऑनलाइन बुकिंग करून सांगली शहर, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातीलच नागरिक शिराळा येथे लस घेण्यास येतात. त्यामुळे येथील नागरिक लसीपासून वंचित रहात आहेत. शासकीय टार्गेट पूर्ण होईल. मात्र, या तालुक्यातील किती नागरिकांना ही लस मिळाली, हा प्रश्न आहे. त्यामुळे ज्या-त्या तालुक्यातच लस दिली जावी, अशी मागणी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली.