शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

कर्नाटकातील हिप्परगीचे दरवाजे बंद ठेवल्यास राजापूर, तेरवाड बंधारे पाण्याखाली; कृष्णेचा फुगवटा वाढण्याचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2024 1:44 PM

महापूर नियंत्रण समितीची भूमिका

सांगली : कर्नाटकातील हिप्परगी धरणाचे दरवाजे बंद ठेवल्याने राजापूर, तेरवाड बंधारे पाण्याखाली गेल्याचा दावा कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने केला आहे. कृष्णा नदीतील पाण्याचा फुगवटा रोखण्यासाठी हिप्परगीचे दरवाजे ३१ ऑगस्टपर्यंत उघडेच ठेवण्याची मागणी केली आहे.यासंदर्भात कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग व कर्नाटक सरकारला पत्र दिले आहे. पत्रात म्हटले आहे की, सांगली, कोल्हापूरचा संभाव्य महापूर रोखण्यासाठी पावसाळ्यात कृष्णा नदी अखंड प्रवाहित राहणे आवश्यक आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात ७ जूनरोजी महापूर नियंत्रण समितीची बैठक झाली होती. त्यावेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यावेळी हिप्परगी धरणारे दरवाजे ३१ ऑगस्टपर्यंत खुले ठेवून संपूर्ण विसर्ग पुढे सोडण्याचा निर्णय झाला होता. त्यासंदर्भात पाटबंधारे विभाग पुढील आवश्यक कार्यवाही करेल असेही ठरले होते. मात्र आजमितीस धरणाचे २२ पैकी १६ दरवाजे बंद आहेत. धरणात २१००० क्युसेक क्षमतेने पाणी जमा होत आहे. उघडलेल्या सहा दरवाजांतून १२००० क्युसेक विसर्ग होत आहे. धरणाची सध्याची पाणीपातळी ५२२.६० मीटर आहे. धरणातील पाण्याच्या फुगवट्यामुळे राजापूर व तेरवाड बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे कोल्हापुरातील राजाराम बंधाराही पाण्याखाली जाऊन वाहतूक थांबली आहे. पाटबंधारे खात्याच्या अकार्यक्षम कारभारामुळे ३० जूनरोजीच ही स्थिती उद्भवली आहे.

अलमट्टी ५१७ खालीच ठेवाहवामान खात्याने यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस वर्तविला आहे. त्यामुळे संभाव्य संकट टाळण्यासाठी हिप्परगी धरणाचे दरवाजे खुले करण्यासाठी कार्यवाही करावी. त्यामुळे पाण्याचा विसर्ग पूर्ण क्षमतेने होऊ शकेल. अलमट्टीची पाणीपातळी ३१ ऑगस्टपर्यंत ५१७ मीटरपेक्षा कमी राहील याची दक्षता घ्यावी.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकfloodपूरDamधरण