कवठेमहांकाळ : आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढण्याचे ठरल्यास तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघात सक्षम उमेदवार देऊन ताकदीने निवडणूक लढण्याचा निर्धार कवठेमहांकाळ तालुका काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आला.
कवठेमहांकाळ येथे लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचे आत्मचिंतन, तसेच दुष्काळाबाबत विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी तालुकाध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तालुका काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत विविध विषयांवर गांभीर्याने चर्चा झाली. बैठकीतील चर्चेनंतर विविध मागण्यांचे निवेदन तयार करून ते प्रदेश काँग्रेसकडे पाठवून देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे लोकसभेचा उमेदवार तालुक्यात तिसºया क्रमांकावर फेकला गेला. येथील काँग्रेसची परंपरागत बहुजन व्होट बँक वंचित आघाडीच्या उमेदवाराकडे वळली. भविष्यात अशाच पद्धतीने जातीपातीचे राजकारण झाल्यास येणाºया निवडणुका अडचणीच्या ठरतील. आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीबरोबर युती करून प्रामाणिकपणे आघाडी धर्म पाळायचा झाल्यास, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समान जागा देऊन सन्मानपूर्वक वागणूक मिळणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जनतेचा ईव्हीएमवर विश्वास राहिला नाही.
अगामी निवडणुका या ईव्हीएमवर न घेता त्या मतपत्रिकेवर घ्याव्यात, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. या बैठकीत बाळासाहेब गुरव, रमेश कोळेकर, संजय कोळी, मोहन लोंढे, सदाशिव शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी धनाजी पाटील, जालिंदर देसाई, वैभव गुरव, विश्वास बोराडे, पोपट पाटील, भीमसेन भोसले, चैतन्य पाटील, अनिल पाटील, राजाराम चव्हाण यांच्यासह तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.बैठकांचे नियोजनआप्पासाहेब शिंदे म्हणाले, इथून पुढच्या काळात तालुक्यातील प्रत्येक गावात कॉँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी बैठकांचे नियोजन करणार आहे. या बैठकांच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे तालुक्यात कॉँग्रेसचे संघटन अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे.