स्टार ९६०
संतोष भिसे- लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनापासून बचावासाठी लस टोचून घ्या असे सरकार कानीकपाळी ओरडून सांगत आहे, प्रत्यक्षात लसीकरण केंद्रांवर मात्र लसीचा ठणठणाट असल्याचे विरोधाभासाचे चित्र आहे.
लस मिळविण्यासाठी लोक धावाधाव करत आहेत. सरकारी रुग्णालयांत पुरेशी लस मिळत नसेल तर खासगीमध्ये ती उपलब्ध करावी, आम्ही पैसे देऊन लस टोचून घेऊ, अशी लाभार्थ्यांची भूमिका आहे. जानेवारीत लसीकरण सुरू झाल्यावर शासनाने खासगी रुग्णालयांना लस पुरवली. दरही ठरवून दिले. जिल्ह्यात अनेक रुग्णालयांनी सशुल्क लसीकरण सुरू केले. सध्या मात्र त्यांच्याकडे लस उपलब्ध नाही. ४७ रुग्णालयांनी लसीकरण केंद्र म्हणून नोंदणी केली आहे. लस उत्पादक कंपन्यांकडून लस विकत घेण्यासाठी त्यांना शासनाच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. तूर्त त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणापुरतीच लस मिळाली आहे.
बॉक्स
शासकीय रुग्णालयांत डोस - १०,०९,६७९
खासगी रुग्णालयात डोस - २७,६०१
१. जिल्ह्यात ४७ खासगी रुग्णालयांनी लसीकरणासाठी जिल्हा प्रशासनाकडे नोंदणी केली आहे; पण त्यांना अद्याप लस मिळालेली नाही.
- जानेवारीत लसीकरण सुरू झाल्यानंतर काही दिवस त्यांनी लसीकरण केले. सध्या मात्र फक्त त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठीच लस मिळाली आहे.
१८ ते ४५ वयोगट
पहिला डोस १,२७,३३९ दुसरा डोस ९,२५४, एकही डोस न घेतलेले १२,२७,०९६
४६ ते ५९ वयोगट
पहिला डोस २,९६,२०१, दुसरा डोस १,१५,७८२, एकही डोस न घेतलेले ६,९५,३२८
६० पेक्षा जास्त
पहिला डोस २,७०,३४५ दुसरा डोस १,२४,७१९, एकही डोस न घेतलेले २,०४,९३६
कोट
खासगी रुग्णालयात लस उपलब्ध करा
लसीसाठी वारंवार ऑनलाईन नोंदणी करूनही अपॉईन्टमेन्ट मिळत नाही. केंद्रावर गेल्यावर लस संपल्याचे सांगतात. पहिला डोस घ्यायचा आहे; पण दुसऱ्या डोसला प्राधान्य असल्याचे सांगितले जाते.
जीवन भोसले, लाभार्थी, मिरज.
सरकारी रुग्णालयांना पुरेशी लस मिळत नसेल तर शासनाने खासगी रुग्णालयांना त्यासाठी परवानगी द्यावी. कोरोना झाल्यानंतर उपचारांसाठी लाखो रुपये खर्च करण्याऐवजी आम्ही विकतची लस घेऊ.
- वैभव सूर्यवंशी, लाभार्थी, सांगली.
खासगी ४७ रुग्णालयांनी लसीकरणासाठी नोंदणी केली आहे. तेथे सामान्यांसाठी लस उपलब्ध नाही. फक्त त्यांच्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच लस आहे. सध्या फक्त शासकीय रुग्णालयांत लसीकरण सुरू आहे.
- डॉ. विवेक पाटील, जिल्हा लसीकरण अधिकारी.