शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
PDP सोबत युती करणार का? निवडणूक निकालापूर्वी फारुक अब्दुल्लांचे सूचक वक्तव्य; म्हणाले...
3
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
4
अमेरिकेने शेख हसिनांचं सरकार कसं उलथवलं? गोपनीय रिपोर्टमधून धक्कादायक गौप्यस्फोट
5
'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ
6
पाक बॅटरला खुन्नस देणं पडलं महागात; Arundhati Reddy वर झाली 'ही' कारवाई
7
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
8
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
9
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
10
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
11
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
12
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
13
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
14
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
15
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
16
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
17
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
18
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
19
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
20
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?

विश्वगुरू व्हायचे असेल तर स्वत:ला बदलावे लागेल - नितीन गडकरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 11:56 AM

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण

सांगली : आत्मनिर्भर भारत, फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी, थर्ड लार्जेस्ट इकॉनॉमी, विश्वगुरु हे सर्व म्हणायला सोपे आहे, पण त्यासाठी आपल्याला बदलायला हवे. दुसऱ्याला सांगण्यापेक्षा बदल स्वत:मध्ये करायला हवेत. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अंगीकार करावा लागेल, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.मराठा समाज संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शुक्रवारी सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण व सभागृह नुतनीकरण कामाचे उद्घाटन गडकरी यांच्याहस्ते करण्यात आले. स्मरणिका प्रकाशनही पार पडले. गडकरी म्हणाले की, सत्ता, संपत्ती अन् सुख पायाशी लोळण घालत असतानाही उपभोगशून्य असलेल्या शिवाजी महाराजांनी रयतेच्या उद्धारासाठी व विकासाकरीता सेवा केली. त्यांचा आदर्श सर्वांनी घेतला तर आपला समाज व देश आता आहे त्यापेक्षा अनेक पटीने पुढे जाईल.ते म्हणाले, कोणताही व्यक्ती हा जात, धर्म, लिंग यानुसार छोटा किंवा मोठा होत नाही. त्याच्यातील गुणांनी तो मोठा होत असतो. शिवाजी महाराज म्हणजे गुणांचा भांडार होते. सर्वांना बरोबर घेऊन कसे राज्य करायचे, याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला. त्यांच्या विचारांचा वारसा सर्वांनी जपला पाहिजे.मराठा समाज संस्थेचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी स्वागत, तर निमंत्रक माजी खासदार संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार विशाल पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार विश्वजीत कदम, माजी आमदार विलासराव जगताप, सदाशिवराव पाटील, दिनकर पाटील, नितीन शिंदे, शिवाजीराव नाईक, रासपचे नेते महादेव जानकर, माजी खासदार राजू शेट्टी, पृथ्वीराज पवार, जनसुराज्य पक्षाचे समीत कदम आदी उपस्थित होते.

जात, पैसा, गुन्हेगारीवर राजकारणसध्या जात, पैसा, गुन्हेगारी हे राजकारणाचे अंगीभूत घटक बनले आहेत. या गोष्टी समाजासाठी चांगल्या नाहीत, असे मत गडकरी यांनी व्यक्त केले.

अभिमानाने छाती फुगतेदेशाच्या कानाकोपऱ्यात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर लोक नतमस्तक होताना दिसतात, तेव्हा मराठी माणूस म्हणून आपली छाती अभिमानाने फुगते, असे मत राष्ट्रवादी पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

छत्रपतींच्या आडनावाने राज्याची ओळख नाहीशरद पवार म्हणाले की, देशात पूर्वी मोघलांचे, आदिलशाहीचे, देवगिरीच्या यादवांचे राज्य अशी वेगवेगळ्या राज्यांची ओळख होती. मात्र, या देशात छत्रपती शिवाजी महाराज असा एकच राजा होऊन गेला ज्याच्या आडनावाने कधी राज्य ओळखले जात नाही. भोसलेंचे राज्य म्हणून ओळख न होता शिवछत्रपतींचे राज्य हे रयतेचे राज्य, हिंदवी स्वराज्य म्हणून ओळखले जाते.

मराठा समाजाची परंपरा कौतुकास्पदमराठा केवळ एक जात नाही. सर्व जाती-धर्मांचा आदर करुन त्यांना सोबत घेऊन जाण्याचा विचार आहे. सांगलीत मराठा समाज संस्थेने तो विचार अनेक सामाजिक उपक्रमातून जपला आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.

पवार गेले, गडकरी आलेशरद पवार व नितीन गडकरी आज एकाच व्यासपीठावर येणार म्हणून उपस्थितांत उत्सुकता होती. मात्र, कार्यक्रमांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे शरद पवार नियोजित वेळेपेक्षा लवकर आले. भाषण करुन ते निघून गेल्यानंतर गडकरींचे कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन झाले. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही.

सांगलीच्या दुष्काळी भागातून नवा महामार्गमुंबईच्या अटल सेतूपासून पुणे व पुण्यातून बेंगलोरपर्यंत नवा राष्ट्रीय महामार्ग साकारला जाणार आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागातून तो जाणार असल्याने येथील विकासला चालना मिळेल, असे गडकरी म्हणाले.

गडकरींना व्यक्तीचित्र नवकृष्णा व्हॅली महाविद्यालयाचे प्रा. सुमेध कुलकर्णी यांनी शुक्रवारी गडकरी यांना त्यांचे व्यक्तिचित्र भेट दिले. व्यक्तिचित्रासाठी कुलकर्णी यांना सत्यजित वरेकर, होळकर, पूजा सकटे यांचे मार्गदर्शन लाभले

टॅग्स :SangliसांगलीNitin Gadkariनितीन गडकरीSharad Pawarशरद पवार