शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० गोळ्या झाडण्याचा अनुभव 
2
Zerodha मध्ये 2.75 कोटींचा घोटाळा! 'डीमॅट अकाऊंट'मुळे कसा बसला कोट्यवधींचा फटका?
3
मुंडेंच्या परळीत पवारांची मोर्चेबांधणी: राजेभाऊ फड यांच्या हाती तुतारी; तिकीट मिळणार?
4
'मला आशा आहे, तुम्ही उत्तर द्याल'; अरविंद केजरीवाल यांचे मोहन भागवतांना पत्र
5
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
6
रोहित पवार बैठकीत मोबाईल, बाटल्या, चाव्या फेकून मारतात; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप
7
लख लख चंदेरी... आलिया भटचा पॅरिस फॅशन वीक मध्ये 'जलवा'; पाहा अभिनेत्रीचे Photos
8
“मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळावे, यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न”: देवेंद्र फडणवीस
9
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
10
WhatsApp मेसेज न वाचताच ब्ल्यू टिक; मुलीच्या खोलीत छुपा कॅमेरा, 'अशी' झाली पोलखोल
11
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाआडून देशाविरोधात षडयंत्र; JPC सदस्याचा खळबळजनक दावा
12
आर्याला घराबाहेर का काढलं? बिग बॉस मराठीचे 'बॉस' खुलासा करत म्हणाले- माणूस म्हणून त्रास...
13
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
14
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
15
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
16
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
17
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
18
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
19
KRN Heat Exchanger IPO: 'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
20
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

सांगली, मिरजेत पुन्हा पेरले गॅस बॉम्ब; जिल्हा पुरवठा विभागाचे सोयीस्कर मौन

By अविनाश कोळी | Published: May 24, 2024 4:09 PM

महापालिका क्षेत्रात सिलिंडर काळाबाजार जोमात

अविनाश कोळीसांगली : पोलिस, जिल्हा पुरवठा विभागाचे अभय मिळत असल्याने सांगली, मिरजेत पुन्हा बेकायदेशीर रिफिलिंग सेंटर्सच्या माध्यमातून गॅसच्या बॉम्बची पेरणी केली जात आहे. दुसरीकडे ग्राहकांसाठी आलेल्या सिलिंडरचा पुरवठा या माफियांना कसा होत आहे, असा सवालही प्रशासनाला पडत नाही. त्यामुळे भविष्यात मोठ्या दुर्घटनेच्या शक्यतेचे ढग यामुळे दाटले आहेत.  मिरजेत सहा महिन्यांपूर्वी बेकायदेशीर गॅस सिलिंडर भरणा केंद्रात स्फोट झाला. दीड वर्षापूर्वीही मिरजेत अशी दुर्घटना घडली होती. वारंवार स्फोटाच्या घटना घडत असताना बेकायदेशीर रिफिलिंग सेंटर्स कसे काय उभारले जात आहेत, असा सवाल उपस्थित हाेत आहे. धोकादायक सेंटर्सच्या माध्यमातून लोकांच्या जिवाशी खेळ खेळण्याचा प्रकार सुरू आहे. भरवस्त्यांमध्ये हे बॉम्ब पेरले गेले आहेत. छापे टाकून पोलिसांनी कारवाई केल्यानंतर काही काळ हे व्यावसाय शांत होतात, मात्र पुन्हा डोकी वर काढून आगीशी खेळ चालू होतो. सिलिंडरचा काळाबाजारही यातून जोमात आहे. महिन्याकाठी ५० ते ५५ लाखांची उलाढालदोन्ही शहरांतील अड्ड्यांच्या संख्येचा विचार केल्यास महिन्याकाठी ५० ते ५५ लाखाची उलाढाल होते. अवघ्या ५० हजार रुपयांच्या गुंतवणुकीत हा बेकायदेशीर व्यवसाय दरमहा लाखो रुपये मिळवून देतो.व्यवसायाचे गणित असे आहेघरगुती गॅस सिलिंडरचा दर सध्या ८०६ रुपये आहे. काळ्या बाजारात अशा अड्डेचालकांना तो १२०० रुपयांनी पुरविला जातो. प्रतिकिलो ९० रुपयांप्रमाणे वाहनांमध्ये गॅस भरला जातो. १४.२ किलोचा सिलिंडर असल्याने प्रतिसिलिंडर २०० रुपयांचा नफा अड्डेचालक कमावतात. प्रत्येक अड्ड्यावर दररोज २५ ते ३० सिलिंडर खर्ची होतात. त्यामुळे दिवसाकाठी ५ ते ६ हजार रुपयांचा नफा त्यांना मिळतो.महापालिका क्षेत्रात सिलिंडर काळाबाजार जोमातसिलिंडरचा इतक्या मोठ्या प्रमाणात या अड्डेचालकांना पुरवठा करणाऱ्या एकूण चार एजन्सीज आहेत. त्या एजन्सीचे कर्मचारी ठिकठिकाणी हे सिलिंडर उतरवितात. अड्डेचालकाची मुले ती दुचाकी व चारचाकी वाहनातून अड्ड्यावर आणतात. जागा बदलून अड्डे सुरू‘लोकमत’ने या विषयावर आवाज उठविल्यानंतर सहा महिन्यांपूर्वी हे अड्डे बंद झाले होते. मात्र, पुन्हा या माफियांनी तोंड वर काढले असून, काहींनी जागा बदलून, तर काहींनी आहे त्याच ठिकाणी अड्डे सुुरू केले आहेत. गॅस भरून घेणाऱ्या काही वाहनचालकांनी दिलेल्या माहितीनुसार मिरजेत सध्या २०, सांगलीत ८ व कुपवाडला ३ ठिकाणी असे गॅस भरणा केंद्र आहेत. हप्तेखोरीचा बाजार गरमज्या शासकीय कार्यालयांचा त्रास या अड्डेचालकांना होऊ शकतो त्याच यंत्रणांचे खिसे गरम करण्याचा सर्वमान्य फंडा या व्यावसायातही आहे. त्यामुळेच उजळ माथ्याने अनेकांनी बेकायदेशीर उद्योगात हात-पाय पसरले आहेत.सावळीला कारवाई; अन्यत्र का नाही?सावळीमध्ये नुकतीच पोलिसांनी अशाच एका भरणा केंद्रावर कारवाई करुन मोठा सिलिंडर साठा जप्त केला. महापालिका क्षेत्रातही अशी कारवाई हवी.

टॅग्स :SangliसांगलीCylinderगॅस सिलेंडर