शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

सांगली जिल्ह्यातील नरवाडच्या हद्दीत मुरुमाचे बेकायदा उत्खनन, संबंधित शेतकऱ्यास १ कोटीचा दंड

By श्रीनिवास नागे | Published: December 06, 2022 5:10 PM

मिरज तालुक्यातील आजवरची मोठी कारवाई

सांगली : मिरज तालुक्यातील नरवाडच्या हद्दीत बेकायदा मुरुमाचे उत्खनन करणाऱ्या शेतकऱ्यांना मिरजेचे तहसीलदार डी. एस. कुंभार यांनी १ कोटी ३२ लाख रुपये दंडाची नोटीस बजावली आहे.कर्नाटक-महाराष्ट्र सीमेलगत शेडबाळ हद्दीजवळ नरवाड येथील गट क्रमांक ४८२ मध्ये गुंडू आप्पासाहेब शिरसागर या कागवाडच्या शेतकऱ्याने जमीन घेतली आहे. संबंधित शेतकऱ्याने महसूल विभागाची कोणतीही परवानगी न घेता दोन हजार ब्रास मुरुम उचलला आहे.

बेकायदा मुरुमाचे उत्खनन सुरू असल्याची माहिती मिळताच नरवाडचे तलाठी आर. आर. कारंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन मुरूम भरलेला डंपर पकडला. गुंडू शिरसागर या शेतकऱ्याने विनापरवाना मुरुमाचे उत्खनन केलेल्या जागेचा पंचनामा करून व डंपर मुरुमासह पकडून तहसीलदारांच्या ताब्यात दिले. मिरज तालुक्यातील आजवरची ही मोठी कारवाई असून बेकायदा शेतातील मुरुमाचे उत्खनन करणाऱ्या शेतकऱ्याला १ कोटी ३२ लाख ३ हजार ६९० रुपये दंडाची नोटीस तहसीलदार कुंभार यांनी बजावली आहे.

याशिवाय बेकायदा मुरुमाची वाहतूक करणाऱ्या विनायक इन्फ्राटेक कंपनीला २ लाख ३९ हजार रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. कर्नाटक व महाराष्ट्राच्या सीमेलगत नरवाड हद्दीत कोणीही विनापरवाना मुरुमाचे उत्खनन करू नये, अन्यथा कठोर कारवाईचा इशारा तलाठी कारंडे यांनी दिला आहे.

टॅग्स :Sangliसांगली