मंत्री जयंत पाटील यांनी अण्णाभाऊ साठेनगर, तसेच सुधाकर वाडकर, सुरेंद्र चौगुले, शिवाजी व धनाजी ढोले यांच्या घरासमोर नागरिकांशी संवाद साधला. त्यांचे प्रश्न समजावून घेतले. यावेळी युवा नेते प्रतीक पाटील, नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा तेजश्री बोंडे, माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिलीपराव वग्याणी, शिवाजीराव ढोले, अमित ढोले, कौशिक वग्यानी, तहसीलदार रवींद्र सबनीस, मुख्याधिकारी कैलास चव्हाण प्रामुख्याने उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक मोहन घस्ते यांचा सत्कार करण्यात आला.
मंत्री जयंत पाटील म्हणाले, आष्टा शहराच्या विकासाला पाच कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आणखी जी विकासकामे समोर येतील, त्या कामांनाही निधी देऊ. आपल्या भागातील क्षारपड जमिनीचे वाढलेले प्रमाण गंभीर असून, त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे.
यावेळी विजयबापू पाटील, बाळासाहेब पाटील, संग्राम पाटील, विराज शिंदे, माणिक शेळके, संग्राम फडतरे, प्रकाश रुकडे, शिवाजी चोरमुले, बबनराव थोटे, सुधाकर वाडकर, जयपाल वाडकर, रघुनाथ जाधव, जगन्नाथ बसुगडे, विजय मोरे, धैर्यशील शिंदे, रुक्मिणी अवघडे, पी. एल. घस्ते, प्रतिभा पेटारे, अर्जुन माने उपस्थित होते
फोटो : २७१२२०२०-आष्टा न्यूजआष्टा न्यूज
फोटो ओळ : आष्टा येथील जनता दरबारमध्ये जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी प्रतीक पाटील, नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा तेजश्री बोंडे, माजी नगराध्यक्ष झुंझारराव पाटील, आदी उपस्थित होते.