फोटो ओळ :
कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यावर आयोजित शेतकरी चर्चासत्रात डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके यांनी मार्गदर्शन केले.
---
पलूस : उसाचे पाचट म्हणजे सोने आहे. ते जाळू नका, त्यामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय कृषी विकास योजनेचे प्रकल्प समन्वयक डॉ. धर्मेंद्रकुमार फाळके यांनी केले.
कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्यावर आयोजित शेतकरी चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष आमदार अरुण लाड होते; तर व्हिएसआयच्या मृदाशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. प्रीती देशमुख प्रमुख उपस्थित होत्या.
डॉ. फाळके म्हणाले, ओझोनचा थर कमी झाल्याने हवामानात बदल झाला. यामुळे पिकावर अनेक रोग आले. यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. या सगळ्यावर मात करायची असेल, तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
आमदार अरुण लाड म्हणाले, शेती ही देशाचा पाया आहे, ती टिकवली पाहिजे. क्रांती कारखान्याच्या माध्यमातून अनेक ऊस विकास योजना राबविल्या जात आहेत. त्यांचा सर्वांनी लाभ घेऊन आपले उत्पादन वाढवावे.
यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष उमेश जोशी, संचालक जयप्रकाश साळुंखे, अरुण कदम, अंकुश यादव, जयवंत कुंभार, कुंडलिक थोरात, महावीर चौगुले, शीतल बिरनाळे, अलका पाटील, पोपट संकपाळ, आत्माराम हारुगडे, कार्यकारी संचालक सी. एस. गव्हाणे, श्रीकांत लाड, मुकुंद जोशी, सचिन घाटगे उपस्थित होते.
ऊस विकास अधिकारी विलास जाधव यांनी सूत्रसंचालन केले.
230921\1753-img-20210923-wa0027.jpg
शेतकरी चर्चासत्र