दरीबडची : खंडनाळ (ता.जत) येथे विवाहित महिलेच्या खून प्रकरणाचा चार दिवसांनी छडा लावण्यात उमदी पोलिसांना यश आले. उसने घेतलेले चार लाख रुपये परत दिले नाही म्हणून डोक्यात मारुन बेशुध्द झाल्यावर विहीरीत टाकून तिचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. मयत इंदु पांडुरंग बिराजदार (वय ४०) असे विवाहित महिलेचे नांव आहे. ही घटना सोमवारी दि.८ रोजी रात्री १० वाजता घडली होती. तिचा मृतदेह मंगळवारी दुपारी ३ वाजता विहीरीत आढळून आला. याप्रकरणी तम्मा श्रीमंत कुलाळ (वय ४१ रा खंडनाळ) याला अटक करण्यात आली आहे. याबाबतची माहिती अशी की, पूर्व भागातील खंडनाळ येथील पाटील वस्तीवर मयत इंदु पांडुरंग बिराजदार या कुंटुंबासमवेत रहातात. सोमवारी सायंकाळी ६ वाजता मयत इंदुमती व तिची लहान मुलगी प्रतिक्षा या दोघी आवटी वस्तीवर नातेवाईकांच्या लहान बाळाला बघायला गेली होती. घराजवळील रस्त्यावरुन मुलीला घरी पाठविले. रस्त्यावरुन कुणाला भेटायला गेली होती. ती घरी रात्री आली नाही. मुलगा बबलू याची गावात दूध संकलन केंद्र आहे. संकलन केंद्र बंद करुन आल्यावर आई घरी आली नाही म्हणून फोन केला. परंतु फोन लागला नाही. फोन बंद होता. तिचा रात्री वस्तीवर शोध घेतला असता मिळून आली नाही. तिचा मृतदेह घरापासून अर्धा कि.मी अंतरावर तुकाराम कुलाळ यांच्या विहीरीत बुधवारी तीन वाजता आढळून आला.चार लाख रूपये उसने दिले होते ते पैसे परत देत नाही म्हणून विहीरीजवळ बाजरीत झटपट झाली.डोक्यात मारुन बेशुद्ध झाल्यावर विहीरीत टाकुन तिचा खून केल्याचे कबुल केले.आरोपी गुन्हा केलेपासुन फरार होता.आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी दोन पथक नेमले होते. महाराष्ट्र कर्नाटक सिमाभागात राहून त्याचे अस्तित्व लपवत होता. परंतु तपास पथकाने शिताफीने व कसोशीने प्रयत्न करुन मोटेवाडी ,पांडोझरी भागात असल्याची माहिती गोपनिय बातमीदारामार्फत मिळाली.आरोपीला अटक केली. मयताच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेतले.मृतदेह विहीरीत फेकून दिला.चोरीच्या उद्देशाने खून केला असावा.असा बनाव केला.विहीरीवर चप्पल, कपडे मिळून आले. मृतदेह टाकलेली विहीर निर्जन ठिकाणी आहे. विहीरीच्या बाजूला कच-याचा मोठा ठिगारा आहे. सहजासहजी दिसत नाही.रानात पेरणी केल्याने कोण जात नाही.त्यामुळे आरोपीने ठिकाण निवडलेले असावे.असा अंदाज आहे. तिचा पति पांडुरंग मुंबई येथे गोदीत हमाली माथाडी मजूर आहेत.मुलगी मुंबई पोलीस,दुसरी मुलगी पोलीस भरती गुणवत्ता निवड यादीत आहे.मुलगी बबलू दूध संकलन केंद्र आहे. फिर्याद मुलगी प्रतिक्षा पांडुरंग बिराजदार (वय-१६) यांनी दिली.आरोपीवर उमदी पोलिस ठाण्यात अपराध क्र आणि कलम गुरनं १८४ भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) कलम १०३ (१) गुन्हा नोंद झाला आहे. पोहेकॉ संतोष माने, वहीदा मुजावर,आप्पासाहेब हाके अगतराव मासाळ ,मनिष कुमरे सोमनाथ पोटभरे, दशरथ कोकाटे,आप्पासाहेब घोडके सुदर्शन खोत यांनी तपास केला.अधिक तपास उमदी पोलिस निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत.आरोपीला सात दिवसाची पोलिस कोठडी: आरोपी तम्मा कुलाळला जत न्यायालयाने दि.१९ पर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. खूनात आणखी कुणाचा सहभाग आहे काय,नेमके कारण,खून करुन कोठे होता.याचा तपास होणार असल्याची माहिती हवलदार आप्पासाहेब हक्के यांनी दिली.
खंडनाळ येथे विवाहित महिलेचा आर्थिक देवाण-घेवाणीतून खून, विहीरीत मृतदेह आढळला; एकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 10:21 PM