सांगली : जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात ६८.६ टक्के पाऊस झाला आहे. या आधारावर आगामी रब्बी हंगामात १ लाख ९० हजार ९६१.८ हेक्टरवर रब्बीची पेरणी अपेक्षित असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाचा आहे. त्यानुसार कृषी विभागाने नियोजन केले आहे. सध्या जिल्ह्यात रब्बीची ३७.२ टक्के पेरणी झाली आहे. ज्वारीची ५२ टक्के तर मका २८ टक्के पेरणी झाली आहे.
जून महिन्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना खरिपाची पेरणी करता आली नव्हती. जुलै महिन्याच्या शेवटी बऱ्यापैकी पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. त्यानंतर १५ ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी केली. पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात जवळपास ८० टक्के पाऊस झाला आहे. धरणांमध्ये पाणीसाठा नसला तरी आतापर्यंत झालेला पाऊस हा मुर स्वरूपाचा असल्याचे मानले जात आहे. त्या अनुषंगाने रब्बी हंगामात १ लाख ९० हजार ९६१.९ हेक्टरवर रब्बीची पेरणी क्षेत्र आहे. यापैकी आतापर्यंत ७१ हजार ६८.३ हेक्टर पेरणी झाली आहे.
जवळपास ३७.२ टक्के पेरणी झाली आहे. पाऊस कमी झाल्यामुळे रब्बी पेरणीही शंभर टक्के होण्याची शक्यता कमी दिसत आहे. हरभरा, गहू, ज्वारी पिकाच्या पेरणीला गती मिळाली आहे. पेरणीला गती नसल्यामुळे कृषी सेवा केंद्र चालकांकडील ४५ टक्केही बियाणाची विक्री झाली नाही. रासायनिक खताला पेरणीसाठी मागणी केली आहे. पण, ऊसासह अन्य पिकासाठी नदीकाठच्या पिकांसाठी रासायनिक खताची मागणी आहे.
रब्बीचे पेरणी क्षेत्रतालुका क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारीमिरज २५३५० ९५१७ ३६.१जत ७९५०५ ५०७०१ ६३.८खानापूर ६३३२ ४४७ ७.१वाळवा १३२३१ ३३ ०.२तासगाव ९४७२ १२७५ १३.५आटपाडी १६१७० ४१९९ २६क. मंहाकाळ १८१८२ ४८७० २६.८पलूस ४४६० २६ ०.६
बियाणांची मागणीपीक बियाणे क्विंटलज्वारी ४९३७गहू १००४५मका ३१५०हरभरा १०१३६करडई १२६सूर्यफुल ७५कांदा १६एकूण २८४८५