मिरज : आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉनतर्फे श्रीमद् भगवतगीतेवर आधारित मूल्यशिक्षण संवर्धन परीक्षेत मिरजेतील कन्या शाळेतील निदा शब्बीर पटेल या मुस्लिम विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळविला. या परीक्षेत मिरज तालुक्यातील २५ शाळांतील दोन हजार विद्यार्थी सहभागी होते. बक्षीस वितरणावेळी संगीता खोत व मुंबई महापालिकेचे उपअभियंता सत्यनारायण प्रभू, रसिकाचार्य प्रभू, डॉ. गिरीश शिंदे यावेळी उपस्थित होते. सहभागी शंभर विद्यार्थ्यांसह तालुका स्तरावर पहिल्या दोन विजेत्यांना सायकल बक्षीस देण्यात आली.
ज्युबिली कन्या शाळेतील नववीतील निदा पटेल या मुस्लिम विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल संगीता खोत यांनी तिचे व तिच्या पालकांचे काैतुक केले. यावेळी कोविड काळात सेवेबद्दल पत्रकारांचाही सत्कार करण्यात आला. इस्कॉनचे विजय रांजणे, विजय सिंधी, डॉ. दीपक इसापुरे, अतुल वायचळ, शुभांगी रसिका यांनी संयोजन केले.शिकवण सारखीच!सर्व धर्मग्रंथांची शिकवण सारखीच आहे. निदाच्या या स्पर्धेत सहभागाबद्दल विचारल्यानंतर आम्ही तिला कोणतीही आडकाठी केली नाही. तिच्या यशाबद्दल आनंद असल्याचे तिचे वडिल शब्बीर पटेल यांनी सांगितले.