शहरं
Join us  
Trending Stories
1
सहानुभूतीवर नाही, मविआचं जागावाटप मेरिटवरच होणार; नाना पटोलेंची रोखठोक भूमिका
2
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
3
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
4
आमचं ‘जीना यहां, मरना यहां’, पण हर्षवर्धन पाटलांंचं तसं नाही, चंद्रकांत पाटील यांची खोचक टीका
5
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
6
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
7
₹15 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड...! लागलं 20% चं अप्पर सर्किट, जबरदस्त आहे कारण
8
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
9
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
10
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
11
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
12
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
13
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
14
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
15
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
16
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
17
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
18
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
19
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
20
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली

मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीतील मराठी नाट्यसंमेलन मुहुर्तमेढ कार्यक्रम स्थगित

By शीतल पाटील | Published: November 01, 2023 8:01 PM

Sangli News: सांगलीत ४ व ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाच्या निमित्ताने शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची मुहुर्तमेढ रोवली जाणार होती. पण मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाट्य संमेलनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

- शीतल पाटीलसांगलीसांगलीत ४ व ५ नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाच्या निमित्ताने शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची मुहुर्तमेढ रोवली जाणार होती. पण मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नाट्य संमेलनाचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, अशी माहिती नाट्यसंमेलनाच्या मुहुर्तमेढ स्वागत समितीचे कोषाध्यक्ष गिरीश चितळे यांनी दिली.

सांगलीत शंभरावे अखिल भारतीय नाट्यसंमेलनाची मुहुर्तमेढ म्हणजेच शुभारंभ होणार होता. रंगभूमिदिनी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, डॉ. जब्बार पटेल यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी स्थानिक पदाधिकार्यांची स्वागत समिती स्थापन करण्यात आली होती. स्वागताध्यक्षपदी आमदार सुधीर गाडगीळ यांची निवड करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या तयारीसाठी समितीच्या बैठका झाल्या होत्या.

नाट्यपंढरी सांगलीत नाट्य संमेलनाची मुहुर्तमेढ रोवली जाणार होती. तर नाट्य संमेलन मुंबईत होणार होते. पण सध्या मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यासह राज्यात आंदोलन सुरू आहे. जिल्ह्यात आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तसेच राजकीय कार्यक्रमही उधळून लावले जात आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचे सावट नाट्य संमेलनावर होते. मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी नाट्य संमेलन कार्यक्रमात राजकीय नेत्यांचा सहभाग नको, अशी भूमिका घेतली होती.

या पार्श्वभूमीवर स्वागत समितीचे कोषाध्यक्ष गिरीश चितळे, नाट्य परिषदेचे अध्यक्ष मुकुंद पटवर्धन, कार्यवाह सनित कुलकर्णी, चंद्रकांत धामणीकर, शशांक लिमये, हरिहर म्हैसकर आदी पदाधिकार्यांची बैठक झाली. या बैठकीत मराठा समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. त्यामुळे नाट्य संमेलनाची मुहुर्तमेढ कार्यक्रम स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती समितीलाही कळवण्यात आले आहे.

सांगलीमध्ये चार आणि पाच नोव्हेंबर रोजी अखिल भारतीय नाट्य परिषदेकडून शंभराव्या नाट्यसंमेलनाच्या मुहूर्तमेढ कार्यक्रम होणार होता. पण तो स्थगित करण्यात आला आहे. याबाबत मुंबईतील मध्यवर्ती कार्यालयाला कळविण्यात आले. तेच याबाबतचा निर्णय जाहीर करतील आणि पुढील तारीख जाहीर केली जाईल.- गिरीश चितळे ( कोषाध्यक्ष, स्वागत समिती) 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSangliसांगली