नोटीस पाठवली होती. या सभासदांची नावे नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत नाहीत. या सभासदांचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यासाठी द्वेष भावनेतून सत्ताधारी मंडळींनी केलेले हे कारस्थान आहे, असा आरोप कृष्णा कारखान्याचे संचालक व माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केला आहे. चिंचणी (ता. कडेगाव) येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अविनाश मोहिते म्हणाले की, २४ मार्च २०२१ रोजी झालेल्या कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत जे सभासद वार्षिक सर्वसाधारण सभांना गैरहजर असतील, त्या सभासदांना क्षमापीत करण्याचा विषय मी स्वतः मांडला होता. परंतु सत्ताधारी मंडळींनी
राजकीय वक्रदृष्टीतून या विषयाची दखल घेतली नाही. आगामी निवडणुकीत या कटकारस्थानाची किंमत सत्ताधारी
मंडळींना मोजावी लागेल. सत्ताधारी मंडळींनी केलेले हे दृष्ट कटकारस्थान आम्ही उर्वरित सर्व सभासदांपर्यंत पोहोचवित आहोत. सभासदांच्या पाठिंब्यावरच हे कटकारस्थान उद्ध्वस्त करणार आहे.
चौकट
कडेगाव व खानापूरमध्ये ११९३ अक्रियाशील
कडेगाव तालुक्यातील २० व खानापूर तालुक्यातील ३ अशा २३ गावांतील
एकंदरीत ११९३ सभासद
अक्रियाशील ठरले आहेत. यामागेही सत्ताधारी मंडळींनी संबंधित सभासदांना दिलेली दुजाभावाची वागणूक आहे, असे अविनाश मोहिते यांनी सांगितले.
चौकट :
पतंगराव कदम यांचेही नाव
माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्यासह कारखान्याचे संस्थापक संचालक नीलकंठराव कल्याणी यांच्या पत्नी सुलोचना कल्याणी यांचेही नाव सत्ताधाऱ्यांनी अक्रियाशील सभासद यादीत घातले आहे. असले कुटिल राजकारण करणाऱ्या सत्ताधारी मंडळींना सभासद त्यांची जागा दाखवतील, असा टोला अविनाश मोहिते यांनी लगावला.