आ. सुरेश खाडे यांनी पक्षाच्या ओबीसी विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी कोरोना काळात पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होऊन मोर्चा, धरणे, आंदोलन या माध्यमातून विविध प्रश्नांवर आवाज उठविला असल्याचे सांगितले. भाजप ओबीसी सेलचे प्रदेश सचिव जयगोंड कोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी भाजप शहर जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे, प्रदेश सरचिटणीस मोहन वनखंडे, प्रदेश सचिव मकरंद देशपांडे, सुरेश आवटी, नगरसेवक पांडुरंग कोरे, स्थायी समिती सभापती निरंजन आवटी, माजी महापौर संगीता खोत, माजी आमदार नितिन शिंदे, शिव प्रतिष्ठानचे नितीन चौगुले, मोहन वाटवे, नगरसेवक गणेश माळी, राजेंद्र कुंभार, डॉ. महादेव कुरणे आदींची उपस्थिती होती. रूपाली गाडवे यांनी आभार मानले.