इस्लामपूर येथे मुस्लिम समाजाच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन जयंत पाटील यांच्याहस्ते केले. यावेळी पीरअली पुणेकर, मुनीर पटवेकर, दादासाहेब पाटील, अॅड. चिमण डांगे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : मुस्लिम समाजाने लोकवर्गणीतून सुरू केलेले कोविड केअर सेंटर कोरोना रुग्णांना चांगली सेवा देईल, असा विश्वास जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला. मुस्लिम समाजाने लोकवर्गणीतून हे सेंटर सुरू करून राज्यात आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
इस्लामपूर येथील ख्रिश्चन बंगला परिसरातील चांदतारा मदरसामध्ये इस्लामपूर मुस्लिम समाज मेडिकल सेंटरच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे पाटील यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी विजय देशमुख, तहसीलदार रवींद्र सबनीस, मुख्याधिकारी अरविंद माळी, उपनगराध्यक्ष दादासाहेब पाटील, माजी नगरसेवक पीरअली पुणेकर, माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, अॅड. चिमण डांगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शहाजी पाटील, नगरसेवक खंडेराव जाधव उपस्थित होते.
हाफिज जावेद यांनी समाजाच्या कार्यासाठी मदरसा इमारत देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
मुनीर पटवेकर म्हणाले, जयंत पाटील, प्रतीक पाटील यांचे मार्गदर्शन व समाजाच्या सहकार्याने हे केअर सेंटर सुरू केलेले आहे. येथे सर्व समाजातील कोविड रुग्णांवर उपचार केले जातील. डॉ. शाहिद कादरी, डॉ. फरिदुद्दीन आत्तार, डॉ. भाऊसाहेब बकाल, डॉ. शाकिर पटेल, डॉ. विवेक वैद्य हे डॉक्टर या सेंटरमध्ये सेवा देत आहेत.
यावेळी जावेद इबुशे, अल्ताफ मोमीन, अजहर जमादार, हाफिज जावेद, मौलाना नरुले, रफिक पठाण, शकील जमादार, आयुब हवालदार, बशीर मुल्ला, अॅड. मीनाज मिर्झा, अबीद मोमीन, मासुम गणीभाई, जलाल मुल्ला, हिदायतुल्ला जमादार, सैफ मुल्ला उपस्थित होते.