कामेरी : कामेरी परिसरातील सर्वसामान्य लोकांची आर्थिक अडचण दूर व्हावी, त्याना योग्य दरात कर्ज उपलब्ध व्हावे म्हणून ‘मिनी बँक’ ही संकल्पना ग्रामीण भागात नव्याने आली आहे. ती अल्पावधीतच लोकप्रिय ठरेल असा विश्वास युवा नेते प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला.
कामेरी (ता. वाळवा) येथे निधी मिनी बँकेच्या माध्यमातून सुरू केलेल्या एटीएमच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सिनेअभिनेते विलास रकटे, सांगली जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, रणजित पाटील, छायाताई पाटील, डॉ. रणजित पाटील, सरपंच स्वप्नाली जाधव, उपसरपंच योगेश पाटील, अशोक कुंभार, निधी मिनी बँकेचे मुख्य प्रवर्तक रवींद्र पाटील, उद्योजक हर्षवर्धन पाटील, छगन पाटील, संग्राम पाटील, पोपट कदम, अमित कुंभार उपस्थित होते.