मिरजवाडी ते सर्वोदय कारखाना पाणंद रस्ता कामाचे उद्घाटन संभाजी कचरे यांच्या हस्ते झाले. यावेळी अनिल गायकवाड, सरपंच विपिन खोत, विलास पाटील, काशिनाथ खोत, विष्णू सावंत, सुरेंद्र साळुंखे, हरिबा खिलारे, प्रकाश नरुटे, हरिदास पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मिरजवाडी गावाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. पाणीपुरवठा योजनेसाठी, तसेच गावातील विविध विकासकामांसाठी कोट्यवधीचा निधी दिला आहे. त्यांच्या मदतीमुळेच पाणंद रस्त्याचे काम मार्गी लागले आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे यांनी केले.
पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतून मिरजवाडी शिवाजीनगर ते सर्वोदय कारखाना या रस्त्यासाठी मंत्री जयंत पाटील यांनी १८ लाख रुपये दिले. त्या कामाचे उद्घाटन संभाजी कचरे यांच्या हस्ते झाले. यावेळी राजारामबापू बँकेचे संचालक अनिल गायकवाड, सरपंच विपिन खोत, विलास पाटील, काशिनाथ खोत, विष्णू सावंत, सुरेंद्र साळुंखे, हरिबा खिलारे, हरिदास पाटील, प्रकाश नरुटे उपस्थित होते.