इस्लामपूर : केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारा प्रायोजित दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य विकास योजनेच्या पहिल्या वर्गाचे उद्घाटन नानासाहेब महाडिक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये कार्यकारी संचालक डॉ. महेश जोशी यांच्या हस्ते झाले.
यावेळी जोशी यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी बीएसए कॉपोर्रेशनचे संचालक विवेक सिनारे यांनी ग्रामीण भागातील मुला-मुलींना प्रशिक्षण देऊन बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने बीएसए कॉपोर्रेशन कटिबद्ध राहील, असे सांगितले. केंद्र व्यवस्थापक स्मिता पाटील, श्याम ढोबळे, डिप्लोमा विभागाचे उपप्राचार्य सी. बी. पाटील, गुरव उपस्थित होते.
फोटो - ०४०१२०२१ आयएसएलएम-महाडिक न्यूज पेठनाका (ता. वाळवा) येथील महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयात ग्रामीण कौशल्य योजनेचे उद्घाटन करण्यात आले.