शिराळा : ग्रामीण भागात आरोग्याच्या अत्याधुनिक सेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्याशिवाय मोठ्या शहरांत माराव्या लागणाऱ्या हेलपाट्यांतून ग्रामीण जनतेची सुटका होणार नाही. स्वस्तिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमुळे सर्व सोई उपलब्ध झाल्या आहेत, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
येथील स्वस्तिक मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार शिवाजीराव नाईक, शाहूवाडी-पन्हाळ्याचे माजी आमदार सत्यजित पाटील, नगराध्यक्षा सुनीता निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार नाईक म्हणाले की, कोरोना महामारीने खूप काही शिकविले आहे. आरोग्याविषयी सर्वांनी जागरूक असायला हवे. शिराळा येथील उपजिल्हा रुग्णालय व कोकरूड ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य व्यवस्था होती; त्यामुळे कोरोनाच्या महामारीस तोंड देऊ शकलो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयराव नलवडे, उपनगराध्यक्ष विजय दळवी, डॉ. नितीन जाधव, डॉ. प्रभाकर पाटील, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. जयदीप नलवडे, डॉ. ओंकार पाटील, डॉ. चंद्रकांत पठारे, डॉ. कृष्णा जाधव, चंद्रकांत निकम, नगरसेवक मोहन जिरंगे, शिवाजीराव खंडागळे, एस. के. खाबले, राहुल पवार, विजय व मोहन पाटील, आदी उपस्थित होते.
फोटो-०८शिराळा२