शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार, कृष्णा नदीची पाणीपातळी १५ फुटांवर; अलमट्टीतून एक लाख क्युसेकने विसर्ग

By अशोक डोंबाळे | Published: July 20, 2024 4:01 PM

धरणात पाण्याची आवक जास्त

सांगली : अलमट्टी धरणामध्ये गुरुवारी ९९.३२ टीएमसी पाणीसाठा होता. यामध्ये १.९ टीएमसीने कपात करून शनिवारी ९७.४२ टीएमसी ठेवला आहे. धरणात पाण्याची आवक जास्त असल्यामुळे कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टीतून शनिवारी दुपारी दीड वाजेपासून एक लाख क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. कोयना ४८ टक्के तर वारणा (चांदोली) धरण ६८ टक्के भरले असून धरण क्षेत्रासह जिल्ह्यात शनिवारी दिवसभर संततधार पाऊस कोसळत आहे. कृष्णा नदीचीसांगली आयर्विन पूल येथे १५ फुटांवर पाणीपातळी गेली आहे.कोयना, वारणा धरण क्षेत्रात शनिवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातही दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. पावसाचा जोर वाढल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी दिवसभरात दोन फुटांनी वाढली आहे. पाऊस जोरात सुरू झाल्यामुळे कृष्णा, वारणा नदीकाठच्या नागरिकांच्या मनामध्ये महापुराची भीती निर्माण झाली आहे. यामुळे कृष्णा, वारणा नदीकाठच्या प्रत्येक नागरिकांचे सध्या अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्याकडे लक्ष आहे.कृष्णा खोऱ्यातील पावसाचा विचार करून कर्नाटक पाटबंधारे विभागाने अलमट्टी धरणातील पाणीसाठा १.९ टीएमसीने कमी करून शनिवारी ९७.४२ टीएमसी ठेवला आहे. धरणात सध्या ७९ टक्के पाणीसाठा आहे. कोयना धरणात ५०.७७ टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण ४८ टक्के भरले आहे. वारणा धरणात २३.५४ टीएमसी पाणीसाठा होऊन ६८ टक्के भरले आहे.

धरणातील पाणीसाठाधरण - आजचा साठा - एकूण क्षमताकोयना - ५०.७७ - १०५.२५धोम - ५.७३ - १३.५०कन्हेर - ४.२६  - १०.१०वारणा - २३.५६ - ३४.४०दूधगंगा - १३.९५ - २५.४०राधानगरी - ६.०८ - ८.३६तुळशी - २.२५ - ३.४७कासारी - १.९६  - २.७७पाटगांव - ३.०६ - ३.७२धोम-बलकवडी - १.३६ - ४.०८उरमोडी - ३.०७ - ९.९७तारळी - २.७४ - ५.८५अलमट्टी - ९७.४२ - १२३.०८

जिल्ह्यात ९.८ मिलीमीटर पाऊसजिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ४.३ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत पडलेला पाऊस व कंसात १ जूनपासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज ८.२ (३०५.१), जत ०.८ (२५१), खानापूर १.५ (२५६.६), वाळवा १७.१ (४१७.५), तासगाव ४.१ (३१७), शिराळा ३६.७ (५७१.८), आटपाडी ०.६ (२२४.२), कवठेमहांकाळ २.१ (३२७.९), पलूस १३.५ (२९४.२), कडेगाव ५.८ (३०८.५).

कृष्णा नदीची पाणीपातळीपाणी पातळी - (फूट इंचामध्ये)कृष्णा पूल कराड ९.०८बहे पूल ७.०३ताकारी पूल १८भिलवडी पूल १८.०८आयर्विन १५राजापूर बंधारा ३०.०१राजाराम बंधारा ३५.०५

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसriverनदी