सांगली : झोपडी पेटविल्याच्या वादातून तुरची (ता. तासगाव) येथील रमेश मारुती पवार (वय ४०) याचा कु-हाडीने हल्ला करून खून केल्याप्रकरणी दोन आरोपींना दोषी धरून जन्मठेप व प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वीरेंद्र ग्यानसिंग बिष्ट यांनी शनिवारी हा निकाल दिला.सुनील झुम-या काळे (वय ४५) व चेतन ऊर्फ बुलेट्या दुर्ग्या पवार (४०, दोघे रा. तुरची) अशी शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. मृत रमेश पवार तुरचीतील गायरान जागेत झोपडीवजा घरात कुटुंबासह राहत होता. मार्च २०१६ मध्ये सुनील काळे व चेतन पवार या दोघांनी त्याची झोपडी पेटवून दिली होती. त्यामुळे रमेश पवारने तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी सुनील काळे व चेतन पवारविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून त्यांच्यातील वाद वाढत गेला. आपल्याविरुद्ध रमेशने तक्रार दिल्याचा राग त्यांच्या मनात होता. यातून त्यांनी २६ एप्रिल २०१६ रोजी सुनील काळे व चेतन पवारने रमेशच्या घरी जाऊन त्याला बाहेर बोलावून घेतले. पोलिस ठाण्यात तक्रार केल्याबाबत जाब विचारला. त्यामुळे त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यानंतर त्याच्यावर कुºहाड, कुकरी व चाकूने हल्ला केला होता. यामध्ये रमेशचा मृत्यू झाला होता.रमेशची आई रंजना पवार घटनेची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होती. पोलिसांनी तिची फिर्याद घेऊन सुनील काळे व चेतन पवारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी तपास करून दोन्ही आरोपींना अटक केली होती. या खटल्यात सरकारतर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये मृत रमेशची आई रंजना पवार, पंच गणेश पाटील, सरपंच राजाराम पाटील, डॉ. जयश्री कांबळे व तपास अधिकारी प्रवीण शिंदे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सहाय्यक जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी खटल्याचे काम पाहिले.न्यायालयाच्या आवारात गर्दीखून खटल्याचा शनिवारी निकाल असल्याचे मृत रमेश पवार व आरोपींच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. आरोपींना शिक्षा सुनावताच पोलिसांनी त्यांना न्यायालयातून बाहेर आणून कारागृहात हलविले.
तुरचीतील खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप, झोपडी पेटविल्याच्या वादातून घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2017 1:32 PM