शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

Crime News Sangli: रागाचा नाही नेम, जिल्ह्यात सतत होतोय ‘गेम’; पोलिसांसमोर गुन्हेगारांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 4:38 PM

किरकोळ कारणावरून खुनासारखे गंभीर प्रकार होत असल्याने या फाळकूटदादांना आता पोलिसी खाक्या दाखविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

सांगली : नजरेला नजर मिळवणे आणि कोणाला मोठ्या आवाजात बोलले तरीही आता थेट त्याचा ‘गेम’ केला जात आहे. खून, खुनी हल्ल्याच्या घटनांनी जिल्हा पुरता हादरला आहे. पाच दिवसात सांगली शहरात दोन खुनाच्या घटना घडल्याने पोलिसांसमोर गुन्हेगारीवर वचक निर्माण करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. किरकोळ कारणावरून खुनासारखे गंभीर प्रकार होत असल्याने या फाळकूटदादांना आता पोलिसी खाक्या दाखविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.रविवारी सायंकाळी सांगली शहरातील शंभरफुटी रस्त्यावर संतोष पवार या अंडाभुर्जी विक्रेत्याचा धारदार शस्त्राने वार करुन खून करण्यात आला. यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून या तरुणाला संपविण्यात आले. केवळ हल्लाच न करता त्याच्या अंडाभुर्जी गाडीचीही हल्लेखोरांनी ताेडफोड केली. रविवार सुटीचा दिवस आणि वर्दळ असतानाही संशयितांनी संतोषवर वार केला. गेल्याच आठवड्यात मंगळवारी रात्री मोठ्याने बोलण्यावरून झालेल्या वादावादीतून गुंड तुकाराम मोटेचा खून झाला होता. याप्रकरणी चार संशयितांपैकी एकावर वार झाल्याने त्यावर उपचार सुरू आहेत. तर अन्य तिघे अटकेत आहेत.क्षणिक राग ठरतोय घातककोणतीही पूर्व वैमनस्य नसताना केवळ मोठ्याने का बोलता म्हणून हटकल्याने गुंड मोटे याचा खून करण्यात आला. यात क्षणिक रागातून तरुणांनी हे कृत्य केले. रविवारी खून झालेल्या संतोष पवार याच्यावर संशयितांनी एकच वार केला. यामागे त्यांची दहशत निर्माण करण्याचा उद्देश असावा मात्र, यात संतोषला प्राण गमवावे लागले.वचक पडतोय कमीशहरात फाळकूट दादांकडून वाढतच चाललेली दहशत सर्वसामान्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. पोलीस ‘प्रतिबंधात्मक’ कारवाईपलीकडे जात नसल्याने या गुन्हेगारांचेही फावले आहे. त्यामुळे दमदाटी करणे, दहशत निर्माण करत मारहाणीचे प्रकार वाढले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारी