लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : पुणे, मुंबई, सांगली, कोल्हापूर आदी शहरातील शाखांमध्ये ठेवींपेक्षा कर्जाचे प्रमाण वाढविण्यावर भर द्यायला हवा, अशी अपेक्षा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली.
राजारामबापू सहकारी बँकेची ४० वी ऑनलाईन वार्षिक सर्वसाधारण सभा येथील मार्केट यार्ड शाखेत पार पडली. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. शामराव पाटील होते. उपाध्यक्ष जनार्दन पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. आर. पाटील, युवा नेते प्रतीक पाटील, विजयबापू पाटील, रवींद्र बर्डे, अॅड. विश्वासराव पाटील उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, कोरोनाच्या संकट काळात कर्जे घेणारांची संख्या मर्यादित राहिली आहे, ती वाढविण्यावर भर द्यावा.
प्रा. शामराव पाटील म्हणाले, अहवाल सालात २ हजार ९४ कोटी रुपयांच्या ठेवी, तर १ हजार ४२६ कोटींची कर्जे दिली आहेत. या वर्षात बँकेस रुपये १० कोटी १ लाख इतका निव्वळ नफा झाला आहे. आपण १० टक्के लाभांश देण्याची तरतूद केली.
अॅड. बी. एस. पाटील, प्राचार्य आर. डी. सावंत, शामराव वाटेगावकर, सुरेश गावडे, आनंदराव पाटील, डॉ. एन. टी. घट्टे, बाळासाहेब पाटील, बाबूराव हुबाले, शिवाजी मगर, रामभाऊ माळी उपस्थित होते.
संचालक माणिक पाटील यांनी श्रध्दांजली अर्पण केली. कार्यकारी संचालक आर. एस. जाखले यांनी सभेचे नोटीस वाचन केले. चीफ जनरल मॅनेजर आर. ए. पाटील यांनी मागील सभेचे वाचन, तर पी. एन. बाबर यांनी सभेचे पुढील विषय वाचन केले. संजय पाटील यांनी आभार मानले. प्राचार्या डॉ. दीपा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.