सांगली : जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णसंख्येत शुक्रवारी पुन्हा वाढ झाली. दिवसभरात ८४६ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर ८३७ जण कोरोनामुक्त झाले. परजिल्ह्यातील एकासह जिल्ह्यातील १३ अशा १४ जणांचा मृत्यू झाला. म्युकरमायकोसिसचे नवीन ४ रुग्ण आढळले, तर दोघांचा मृत्यू झाला.
सरासरी साडेसहाशेवर असलेल्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ झाल्याने चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील १३ जणांचा मृत्यू झाला, त्यात सांगली ३, मिरज १, मिरज तालुक्यातील ३, खानापूर २, जत, कडेगाव, शिराळा आणि वाळवा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला.
आरोग्य विभागाच्या वतीने आरटीपीसीआर अंतर्गत ७२४१ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात ३७१ जण बाधित आढळले तर रॅपिड अँटिजनच्या ८१४९ जणांच्या नमुने तपासणीतून ४९२ जण पॉझिटिव्ह आढळले.
उपचार घेत असलेल्या ७३६५ जणांपैकी ९११ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ७७५ जण ऑक्सिजनवर तर १३६ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. परजिल्ह्यातील एकाचा मृत्यू झाला तर नवीन १७ रुग्ण उपचारास दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १,७४,१२८
उपचार घेत असलेले ७,३६५
कोरोनामुक्त झालेले १,६२,१६०
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ४,६०३
शुक्रवारी दिवसभरात
सांगली १२९
मिरज २३
आटपाडी २८
कडेगाव ६६
खानापूर १०३
पलूस ४७
तासगाव ८८
जत ७९
कवठेमहांकाळ ५५
मिरज तालुका ८२
शिराळा ३८
वाळवा १०८