सांगली : जिल्ह्यातील कोरोना संख्येत सोमवारी पुन्हा वाढ झाली. दिवसभरात ३६३ जणांना कोरोनाचे निदान होतानाच १४ जणांचा मृत्यू झाला. ४०८ जण कोरोनामुक्त झाले.
जिल्ह्यात कोरोनाने मृत्यूसंख्येतही वाढ झाली असून, १३ जणांचा मृत्यू झाला. त्यात मिरज २, मिरज तालुक्यातील ४, वाळवा ३, आटपाडी, कडेगाव, पलूस आणि तासगाव तालुक्यांतील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
आरोग्य विभागाने आरटीपीसीआर अंतर्गत ३९७४ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली, त्यात १८९ जण बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजनच्या ५१२० जणांच्या नमुने तपासणीतून १८१ जण पॉझिटिव्ह आढळले.
उपचार घेत असलेल्या रुग्णसंख्येत मात्र चांगलीच घट होत आहे. त्यानुसार सध्या २४६९ जण उपचार घेत असून, त्यातील ५८२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ४८० जण ऑक्सिजनवर, तर १०२ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
परजिल्ह्यातील एकाचा मृत्यू, तर नवीन सातजण उपचारास दाखल झाले.
चौकट
आतापर्यंतचे एकूण बाधित १९४२८९
उपचार घेत असलेले २४६९
कोरोनामुक्त झालेले १८६७०७
आतापर्यंतचे एकूण मृत्यू ५११३
सोमवारी दिवसभरात
सांगली ३९
मिरज ९
आटपाडी ४३
कडेगाव २४
खानापूर ६५
पलूस २८
तासगाव ६५
जत १९
कवठेमहांकाळ ९
मिरज तालुका २३
शिराळा ८
वाळवा ३१