कवठे महांकाळ तालुक्यातील रांजणी, अग्रण धुळगाव, लोणारवाडी, कोकळे, नागज व परिसरात ऊसतोडीनंतर राहिलेला ऊसाचा पाला गोळा करून एकत्रित गठ्ठे बांधण्याचे काम जोमाने सुरू आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेलर नावाची मशीन त्यासाठी उपलब्ध झाली आहे. ही मशीन ऊसाचा पाला गोळा करून, एकत्र करून, त्याचे गठ्ठे बांधून बाजूला टाकते. एक गठ्ठा बांधण्यासाठी १८ रुपये खर्च येतो. दिवसाकाठी ह्या मशिनद्वारे साधारणपणे ४५० इतके गठ्ठे तयार केले जातात. घट्ट गोळा केलेला ऊसाचा पाला द्राक्षाच्या बागेमध्ये बागेत गारवा धरून राहाण्यासाठी व खत निर्मितीसाठी खोडांसाठी वापरला जातो. द्राक्षाचे खोड उन्हाने वाळू नये म्हणून तसेच त्याचा खतासाठी ही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे पन्नास साठ मशिनी कवठेमहांकाळ तालुक्यात काम करीत आहेत.
कवठेमहांकाळ तालुक्यात ऊसतोडीसाठी यांत्रिकीकरणाचा वाढता वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 4:16 AM