शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एकाच वाक्यात सांगितलं
3
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
4
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
5
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
6
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
7
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
8
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
9
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
10
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
11
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
13
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
15
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
16
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
18
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
19
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठं यश; आरोपींना आर्थिक मदत करणारा सापडला अन्...
20
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका

जतमध्ये अवकाळीचा डाळिंबांना फटका

By admin | Published: December 14, 2014 9:58 PM

चुकीचे पंचनामे केल्याचा आरोप : शासनाच्या मदतीपासून शेतकरी वंचित

दरीबडची : जत तालुक्यात गेल्या महिन्यामध्ये अवकाळीने तडाखा दिल्याने द्राक्ष, डाळिंबबागांना मोठा फटका बसला होता. अनेक शेतकऱ्यांच्या बागेमध्ये बहरात आलेले डाळिंब पीक एका रात्रीत फुटून गेले. ७५ टक्क्यावर बागा तेल्याने (बिब्ब्या) गेल्या असताना, कृषी विभागाने चुकीचे आणि वस्तुस्थिती न पाहता पंचनामे करून द्राक्षे व डाळिंब बागांचे ५० टक्क्यापेक्षा कमी नुकसान क्षेत्र दाखविले आहे. नैसर्गिक संकटाबरोबर मानवनिर्मित चुकीच्या पंचनाम्यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहावे लागणार असल्याने शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.नोव्हेंबर महिन्यामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला होता. द्राक्षे व डाळिंब फळबागांचे मोठे नुकसान झाले. दीड-दोन महिन्यात सलग दोन, तीनवेळा ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे डाळिंबावर तेल्या, तर द्राक्षावर दावण्याचा प्रादुर्भाव झाला होता. अनेक शेतकऱ्यांच्या बागा बहरात आलेली डाळिंबं एका रात्रीत फुटून गेली.तालुक्यामध्ये डाळिंबाचे क्षेत्र ९ हजार ३४४.५९ हेक्टर आहे. गणेश, केशर जातीच्या बागा आहेत. दुष्काळात पिचलेला आणि कर्जे काढलेला शेतकरी अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाने आर्थिक संकटात आला आहे. ज्या बागा फुलोऱ्यात (फ्लॉवरिंग स्टेज) होत्या, त्यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. २० ते ६० टक्के द्राक्षघडांची गळ झाली आहे. दावण्याचा प्रादुर्भाव झाला आहे. ४४० हेक्टर द्राक्षबागांना फटका बसला आहे.शेतकऱ्यांनी नुकसानग्रस्त डाळिंब, द्राक्षे फळबागांचा सर्व्हे करून नुकसानग्रस्त बागांना नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार कृषी विभागाने पंचनामे करण्याचा आदेश दिला होता. याबाबतचा अहवालही शासनाला सादर करण्यात आला आहे. यामध्ये तालुक्यात मोठे नुकसान होऊनही डाळिंब, द्राक्ष या फळबागेचे ५० टक्क्यापेक्षा कमी नुकसान दाखविण्यात आले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बागांमध्ये न जाता, वस्तुस्थिती न पाहता पंचनामे कले आहेत. यामुळे पंचनामे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. तालुक्यामध्ये गेल्या महिन्यामध्ये अवकाळी ६ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी पंचनाम्याची जबाबदारी न घेतल्यामुळे सर्व कृषी सहायकांनी मिळून सर्व पंचनामे ५० टक्क्यापेक्षा कमी दाखविले आहेत. यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या मदतीपासूनही या शेतकऱ्यांना चुकीच्या पंचनाम्यामुळे वंचित राहावे लागणार आहे. (वार्ताहर)अवकाळीने नुकसान झालेले क्षेत्र हेक्टरमध्येपीक५० टक्केपेक्षा कमीजास्तएकूणडाळिंब१५८३.८९ हे.००२९७४.२१ हे.द्राक्षे११५० हे.००१५६७ हे.अधिवेशनात आवाज उठविण्याची मागणीनिसर्गाबरोबरच कृषी विभागाच्या चुकीच्या पंचनाम्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. कार्यालयात बसून पंचनामे करणाऱ्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी. ७५ टक्केपेक्षा जास्त द्राक्षे, डाळिंब बागांचे नुकसान झाले आहे. बोगस पंचनाम्यांविषयी आ. विलासराव जगताप यांनी नागपूर अधिवेशनात आवाज उठवावा, अशी आमची मागणी आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रशेखर रेबगोंड यांनी सांगितले.