शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

औद्योगिक कामगार सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Published: November 02, 2014 12:36 AM

जिल्ह्यात पाच अपघात : कारखानदारांकडून नियमांना फाटा देण्यावर भर, समस्येचाच धूर अधिक

अंजर अथणीकर ल्ल सांगलीसांगली, मिरज आणि कुपवाड शहर परिसरातील औद्योगिक वसाहतीत वीस हजारहून अधिक कामगार काम करीत असताना सुरक्षेचे नियम मात्र धाब्यावर बसवले जात आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये गेल्या वर्षभरात पाच मोठे अपघात झाले असून, यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू, तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.सांगली जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये सुमारे ९५०, तर सांगली, मिरज आणि कुपवाड परिसरात सातशे लहान, मोठे कारखाने आहेत. सांगली, मिरज व कुपवाड परिसरातील चार औद्योगिक वसाहतींमध्ये वीस हजारहून अधिक कामगार काम करीत आहेत. दहाहून अधिक कामगार असल्यास त्याठिकाणी स्वच्छतागृहाची, कँटीन व विश्रामगृहाची सोय असणे बंधनकारक असताना या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. कारखाना कायद्यानुसार कारखान्यात काम करणाऱ्यांना सुरक्षा बेल्ट, हेल्मेट, हातमोजे, पायमोजे, बूट देणे बंधनकारक असताना ८० टक्क्यांहून अधिक कारखान्यांमध्ये ते पुरवले जात नाहीत. यामुळे गेल्या वर्षभरात पाच मोठे अपघात झाले असून, यामध्ये दोन कामगारांचा मृत्यूही झाला आहे. कामगारांना सुविधांबरोबरच न्याय हक्कापासूनही वंचित ठेवण्यात येत आहे. दहाच्यावर कामगार असतील तर, त्यासाठी नियम लागू होतील म्हणून नेहमी दहाच्या खालीच कामगार संख्या दाखवण्यात येत आहे. कामगारांचे रजिस्टर ठेवण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. औद्योगिक वसाहतीमधील ७५ टक्के कारखाने कामगारांचा ईएसआय, प्रॉव्हिडंड फंड भरत नाहीत. यामुळे त्यांना अपघाती विम्याचा लाभ मिळत नाही. ईएसआयची रक्कम न भरल्यामुळे कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असून, ते औषधोपचारापासून वंचित रहात आहेत. अपघातानंतरही मालकावर फौजदारी होताना दिसत नाही. नेहमी वेगवेगळी कारणे सांगून कामगारांना मदतीपासून डावलण्यात येत आहे.