बुधगावात राज्य शासनाच्या अखत्यारीतील पशुवैद्यकीय दवाखाना आहे. या दवाखान्याच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ४२ लाख ४० हजार ५१५ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. दुरुस्तीअंतर्गत छतावर नवीन पत्रे बसविणे, भिंतींना नव्याने गिलावा करणे, फरशी बसविणे, पेव्हिंगब्लाॅक बसविणे आदी कामे प्रस्तावित आहेत. त्यानुसार मागील काही दिवसांपासून काम सुरू झाले आहे. मात्र, होत असलेली कामे निकृष्ट असून, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदारांनी यामध्ये संगनमताने भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या गणेश पाटील, नेताजी भगत, बजरंग भगत, कविता पाटील आदी कार्यकर्त्यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे केला आहे. संबंधितांवर कारवाई न झाल्यास पालकमंत्री जयंत पाटील यांना निवेदन देणार असून प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बुधगाव पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम निकृष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 4:20 AM