अधीक्षक गेडाम म्हणाले, जिल्ह्यात घडलेले गुन्हे व त्या गुन्ह्यातील गुन्हेगारांची माहिती जिल्हा पोलीस दलाच्या संकेतस्थळावर देण्यात येणार आहे. इंटरनेटचा वापर करणाऱ्या प्रत्येकाला ही माहिती पाहता येईल. यामुळे नागरिकांनाही गुन्हेगार ओळखणे शक्य होणार आहे. दागिने चोरून पसार होणारे गुन्हेगार किंवा घरफोडीतील संशयितांना याव्दारे ओळखता येऊ शकते. गुन्ह्यांचा तपास करताना नागिरकांचे सहकार्य मिळाल्यास गुन्हेगारांपर्यंत पोहोचणे शक्य होणार असल्यानेच ही सोय करण्यात येणार आहे.
सध्या पोलीस दलाच्या संकेतस्थळाचे अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर येत्या दोन महिन्यात गुन्हेगारांची माहिती व इतर माहिती देण्यात येणार आहे. पोलीस दलातील गुन्ह्यांचा तपासात तंत्रज्ञानाचा वापर वाढविल्यास त्याचा फायदा होणार असल्याचेही गेडाम यांनी सांगितले. यावेळी अप्पर अधीक्षक मनीषा दुबुले, एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड उपस्थित होते.