जत : जिल्हा बँकेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना जाणूनबुजून त्रास दिला जातो. जिल्ह्यातील कोणाही मागासवर्गीय कर्मचारी-अधिकारी यांच्यावर हेतुपुरस्सर कारवाई झाल्याचे निदर्शनास येत आहे. जर मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना अन्याय झाला तर रिपब्लिकन (आठवले गट) पक्षातर्फे बँकेसमोर उपोषण करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी दिला आहे.
संजय कांबळे पुढे म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर जाणूनबुजून कारवाई केली जात आहे. सध्या जत तालुक्यातील काही मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना विनाकारण नाहक त्रास देणे, चौकशी लावण्याची भीती दाखविण्याचे प्रकार सुरू आहेत. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर बिनबुडाचे आरोप करून मुद्दाम बदल्या केल्या जात आहेत. जत तालुक्यातील जिल्हा बँकेच्या शाखेतील काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी चुकीचे व नियमबाह्य कर्जवाटप केलेले आहे. त्यांना दंड होऊनही त्याच बँकेत मोठ्या हुद्यावर नियुक्त केलेले आहे. जत तालुक्यातील काही कर्मचारी हे नवीन नियुक्त केले आहेत. आमच्याकडे काही विकास सोसायटीच्या अध्यक्ष, संचालक मंडळ, मोठे ठेवीदार व शिष्टमंडळ यांनी फोन करून अशा पद्धतीच्या तपासण्या करणे, हे कर्मचाऱ्यांवर व विकास संस्थेवर बदनामी करण्याचे षडयंत्र थांबवावे, अशी मागणी केली आहे. बँकेतील मागासवर्गीय कर्मचारी, अधिकाऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला जात आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीच्या मागणीसाठी जिल्हा बँकेसमोर आंदोलन करणार आहे.
100821\img-20201115-wa0018.jpg
संजय कांबळे फोटो